जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / स्कुटीवरच्या महिलेला 10 किमी फरफटत नेलं, नग्न अवस्थेत मिळाला मृतदेह, राजधानी हादरली!

स्कुटीवरच्या महिलेला 10 किमी फरफटत नेलं, नग्न अवस्थेत मिळाला मृतदेह, राजधानी हादरली!

स्कुटीवरच्या महिलेला 10 किमी फरफटत नेलं, नग्न अवस्थेत मिळाला मृतदेह, राजधानी हादरली!

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 जानेवारी : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी स्कुटीवरून अमन विहारमधल्या तिच्या घरी जात होती. 10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता, असं तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. नव्या वर्षाच्या जल्लोषानिमित्त संपूर्ण दिल्ली पोलीस रस्त्यावर असतानाच ही घटना घडली आहे. या घटनेवेळी मुलगी कारमध्ये अडकली. जीव वाचवण्यासाठी ती ओरडत होती, पण कुणीही तिची मदत केली नाही. इतके अमानुष अत्याचार झाल्यामुळे पीडितेच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. मुलीचे दोन्ही पाय, डोकं आणि शरिराचे इतर अवयव चिरडले गेले होते. दिल्लीच्या सुलतानपुरी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात

पीडित तरुणीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम सुरू आहे. आरोपी तरुणांनी दारूच्या नशेत आपण गाडी चालवत होतो, तसंच गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्यामुळे आपल्याला बाहेर तरुणी अडकली असल्याचं समजलं नाही, असं पोलिसांना सांगितलं आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं दीपक खन्ना, कृष्ण, अमित खन्ना, मिथुन आणि मनोज मित्तल अशी आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांना समन पाठवलं आहे. दिल्लीच्या कंझावालामध्ये एका मुलीचा नग्न अवस्थेतला मृतदेह सापडला आहे. काही मुलांनी दारूच्या नशेत मुलीच्या स्कुटीला टक्कर दिली आणि काही किलोमीटर तिला फरफटत नेलं. हे प्रकरण गंभीर आहे, आम्ही दिल्ली पोलिसांना हजर राहण्याचे समन्स बजावत आहोत. संपूर्ण प्रकरण समोर आलं पाहिजे, असं दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात