• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • महिलेनं बॉयफ्रेंडला दिलं 17 पानी रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट लेटर; डेटवर जाण्याआधी केली अजब मागणी

महिलेनं बॉयफ्रेंडला दिलं 17 पानी रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट लेटर; डेटवर जाण्याआधी केली अजब मागणी

एका तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी आपल्या मागण्यांची मोठी लिस्ट (Demand List of Girlfriend) त्याला दिली. ही लिस्ट म्हणजेच रिलेशशिप कॉन्ट्रॅक्ट (Relationship Contract) आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर : असं म्हणतात की जोड्या देवच बनवतो. मात्र, आजकाल लोक नातीही एखाद्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे निभावताना दिसतात. नाती (Relationship) कॉन्ट्रॅक्टप्रमाणे निभावली जातात हे ऐकून तुम्ही हैराण झाला असाल. मात्र, नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. यात एका तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी आपल्या मागण्यांची मोठी लिस्ट (Demand List of Girlfriend) त्याला दिली. ही लिस्ट म्हणजेच रिलेशशिप कॉन्ट्रॅक्ट (Relationship Contract) आहे. जो या दोघांना एकमेकांसोबत नात्यात बांधतो. तहानलेल्या कावळ्यानंतर भुकेल्या कावळ्याचा VIDEO; खाण्यासाठी अशी लढवली युक्ती 21 वर्षीय एनी राईट काही काळापूर्वीच एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती. जेव्हा या नात्यातून ती बाहेर पडली तेव्हा पुन्हा रिलेशनशिपमध्ये येण्यास तिला भीती वाटत होती. याचदरम्यान मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिची भेट 23 वर्षीय मायकल हेडसोबत टिंडरवर झाली. एनीची अशी इच्छा होती की तिच्या मागील रिलेशनशिपच्या तुलनेत मायकलसोबतचं तिचं नातं चांगलं असावं. यामुळे तिनं एक सतरा पानी रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट मायकलला दिलं. या कॉन्ट्रॅक्टमध्ये तिनं लिहिलं, की ते दोघं डेटवर जातील तेव्हा पैसे मायकलनं द्यावे, महिन्यात दोन वेळा तिला फुलं गिफ्ट करावी आणि आठवड्यात पाच वेळा वर्कआऊट करावं. 10 वर्षात 25 वेळा वेगवेगळ्या प्रियकरांसोबत पळून गेली महिला; पतीनं केला खुलासा एनीनं सांगितलं, की दोघांनीही असं ठरवलं आहे की आपलं नातं ते अटींसोबतच सुरू करणार आहेत. रिस्क मॅनेजमेंटची विद्यार्थीनी एनी आणि लॉ स्टूडंट मायकलनं रिलेशनशिपसाठी आपले नियम बनवले. एनीनं सांगितलं, की त्यांचं नातं एखाद्या बिजनेस मिटींगसारखं आहे. नात्यात येणाऱ्या समस्या ते त्याच पद्धतीनं सोडवतात जसे आपल्या क्षेत्रातील बिजनेस पार्टनरसोबत तोडगे काढतात. एनीनं सांगितलं, की मायकल तिच्यासाठी खूप वेळा फुलं घेऊन येतो. या कॉन्ट्रॅक्टची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे दोघंही कधीच एकमेकांना दोष देणार नाहीत. हे कपल वर्षाच्या शेवटी एक मिटिंगही घेतं. यात हे वर्ष त्यांच्या नात्यासाठी कसं होतं आणि आणखी काय सुधारणा करणं गरजेचं आहे, यावर विचार केला जातो.
  Published by:Kiran Pharate
  First published: