• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 10 वर्षात 25 वेळा वेगवेगळ्या प्रियकरांसोबत पळून गेली 3 मुलांची आई; पतीनं केला हैराण करणारा खुलासा

10 वर्षात 25 वेळा वेगवेगळ्या प्रियकरांसोबत पळून गेली 3 मुलांची आई; पतीनं केला हैराण करणारा खुलासा

एक महिला तब्बल 25 वेळा आपल्या वेगवेगळ्या प्रियकरांसोबत पळून गेली (Woman Elopes 25 Times with Different Lovers) आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर : आपण असं अनेकदा ऐकलं असेल की प्रेमात (Love) आणि लढाईत (War) सगळं काही माफ असतं. प्रेमात लोक समाजाच्या नियमांना फाटा देत असं काही करताता ज्यामुळे चर्चेत येतात आणि समाज त्यांना चुकीचं समजू लागतो. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत आयुष्य घालवण्यासाठी घरातून पळ काढतात. हे फक्त चित्रपटांमध्येच (Movies) नाही तर प्रत्यक्षातही बऱ्याचदा घडतं. मात्र, सध्या जी घटना चर्चेत आहे , ती अतिशय वेगळी आहे. यात एक महिला तब्बल 25 वेळा आपल्या वेगवेगळ्या प्रियकरांसोबत पळून गेली (Woman Elopes 25 Times with Different Lovers) आहे. ...अन् हवेत उडू लागला कुत्रा; Flying dog चा VIDEO पाहून थक्क व्हाल हे वाचून तुम्हीही हैराण झाला असाल. आसामची (Assam) एक 40 वर्षीय महिला मागील 10 वर्षात 25 वेळा आपल्या प्रियकरांसोबत पळून गेली. प्रत्येक वेळी ती आपल्या वेगळ्या प्रियकरासोबत पळून जाते. विशेष बाब म्हणजे काही दिवसांनी ही महिला जेव्हा आपल्या सासरी परत येते तेव्हा प्रत्येक वेळी तिचा पती आणि सासू तिला माफ करतात. महिलेच्या लग्नाला दहा वर्ष झाले आहेत आणि तिला तीन मुलंही आहेत. यातील मोठ्या मुलीचं वय 6 वर्ष, मुलाचं 3 वर्ष तर सर्वात लहान मुलाचं वय 3 महिने आहे. महिलेचा पती मफिजुद्दीन ड्रायव्हर आहे. हे कुटुंब आसाममधील ढिंग लाहकर गावात राहातं. मफिजुद्दीननं सांगितलं, की साल 2011 मध्ये माझं लग्न झालं होतं. तेव्हापासून माझी पत्नी तब्बल 25 वेळा आपल्या वेगवेगळ्या प्रियकरांसोबत पळून गेली आहे. प्रत्येक वेळी जेव्हा ती परत येते तेव्हा असं वचन देते की पुढच्या वेळी असं काही करणार नाही, मात्र प्रत्येक वेळी ती आपलं वचन विसरते. कचऱ्याच्या वादावरून महिला भिडल्या; जोरदार हाणामारीचा VIDEO VIRAL मफिजुद्दीननं सांगितलं, की अनेकदा त्याची पत्नी घरी येऊन सांगते की ती तिच्या माहेरी गेली होती किंवा आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटायला गेली होती. पुढे त्यानं सांगितलं, की आम्हाला तीन मुलं आहेत. मुलांच्या सांभाळासाठी मी प्रत्येक वेळी तिला माफ करतो. नुकत्यात घडलेल्या घटनेबाबत बोलताना महिलेच्या पतीनं सांगितलं, की 4 सप्टेंबरला मी जेव्हा कामावरुन परतलो तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं, की माझी पत्नी तीन महिन्यांच्या बाळाला शेजाऱ्याकडे ठेवून पळून गेली. तिने शेजाऱ्याला सांगितलं, की बकरीसाठी चारा आणायला जात आहे. मात्र, ती घरातून 22 हजार रुपये घेऊन प्रियकरासोबत फरार झाली.
  Published by:Kiran Pharate
  First published: