मुंबई, 11 सप्टेंबर : तहानलेल्या कावळ्याची (Thirsty crow) गोष्ट आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या अशाच प्रत्यक्षात एका कावळ्याचा व्हिडीओ (Crow video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे, जो तहानलेला नाही पण भुकेलेला (Hungry crow) मात्र जरूर आहे. ज्याप्रमाणे बोधकथेतील कावळ्याने (Smart crow) पाणी पिण्यासाठी युक्ती लढवली अगदी तशीच युक्ती या कावळ्याने खाण्यासाठी लढवली आहे (Intelligent crow). कावळा किती हुशार असतो हे या व्हिडीओतून दिसून येतं. बोधकथेत त्याने रांजणाच्या तळाशी गेलेलं पाणी पिण्यासाठी जशी युक्ती केली. तशीच युक्ती त्याने एका ग्लासातील एक पदार्थ काढण्यासाठी केली. नेमकं या कावळ्याने काय केलं ते तुम्हीच या व्हिडीओत पाहा.
The IQ level though 🦅pic.twitter.com/s2barHijnb
— Praveen Angusamy IFS 🐾 (@JungleWalaIFS) September 9, 2021
व्हिडीओत पाहू शकता जमिनीवर एक ग्लास आहे. त्याच्या आत काहीतरी आहे. कावळ्याला कदाचित भूक लागली आहे त्यामुळे त्याला ते ग्लासमधून बाहेर काढायचं आहे. हे वाचा - …अन् हवेत उडू लागला कुत्रा; Flying dog चा VIDEO पाहून थक्क व्हाल सुरुवातीला कावळा बघतो की ती वस्तू ग्लासच्या खूप आत आहे, जिथपर्यंत त्याची चोच जाऊ शकत नाही. मग तो तिथून जातो. पण लगेचच तो तिथं पुन्हा येतो तेव्हा त्याच्या हातात एक छोटी लांब काठी असते. कावळा ती काठी आपल्या चोचीत धरतो आणि ती ग्लासमध्ये टाकतो. काठीने हळूच ती वस्तू ग्लासमधून आपल्या दिशेने खेचून घेतो. वस्तू कावळ्याच्या चोचीत येईल इतक्या अंतरापर्यंत येते. तेव्हा कावळा आपल्या चोचीतल काठी बाजूला टाकतो आणि ग्लासमध्ये चोच टाकून ती वस्तू काढतो. हे वाचा - कधी पक्ष्याला चोरी करताना पाहिलंय का? चोरीचा हा VIDEO पाहून लावाल डोक्याला हात अखेर कावळ्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालंच. प्रयत्न करून तो आपलं लक्ष्य साध्य कऱण्यात यशस्वी झालाच. आयएएस अधिकारी प्रवीण गोस्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कावळ्याच्या हुशारीला सर्वांनी दाद केली आहे, त्याचं कौतुक केलं आहे.