मराठी बातम्या /बातम्या /Viral /वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळीच मुलीचं विचित्र कृत्य; फोटो पाहून संतापले नेटकरी

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळीच मुलीचं विचित्र कृत्य; फोटो पाहून संतापले नेटकरी

या महिलेनं स्वतःच अतिशय  ग्लॅमरस पोज देत आणि ग्लॅमरस ड्रेस घालून एक फोटो शेअर केला आहे.. आता तुम्ही विचार करत असाल, की ग्लॅमरस पोजमध्ये फोटो काढण्यात चुकीचं काय

या महिलेनं स्वतःच अतिशय ग्लॅमरस पोज देत आणि ग्लॅमरस ड्रेस घालून एक फोटो शेअर केला आहे.. आता तुम्ही विचार करत असाल, की ग्लॅमरस पोजमध्ये फोटो काढण्यात चुकीचं काय

या महिलेनं स्वतःच अतिशय ग्लॅमरस पोज देत आणि ग्लॅमरस ड्रेस घालून एक फोटो शेअर केला आहे.. आता तुम्ही विचार करत असाल, की ग्लॅमरस पोजमध्ये फोटो काढण्यात चुकीचं काय

नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : आई किंवा वडिलांचं या जगाचा निरोप घेणं हे कोणत्याही मुलासाठी अतिशय वेदनादायी असतं. कारण, त्यांची कमी नेहमीच जाणवते आणि त्यांची जागाही कोणीच घेऊ शकत नाही. मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची वेळ अशी असते, जेव्हा केवळ कुटुंबीयच नाही तर दुरच्या लोकांचे डोळेही पाणवतात. अशावेळी प्रत्येकाकडून अशी अपेक्षा केली जाते, की व्यक्तीनं मौन धारण करावं आणि मृत व्यक्तीच्या प्रती आपल्या संवेदना मनातल्या मनात व्यक्त कराव्या. मात्र, कदाचित प्रत्येकच व्यक्ती या गोष्टी समजत नाही. सध्या अशाच एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. तिनं आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी हा फोटो क्लिक केला (Viral Photo of Funeral).

मला तुरुंगात डांबा पण बायकोसोबत नका ठेवू, त्रस्त पतीची पोलिसांना कळकळीची विनंती

सोशल मीडिया साईट रेडिटवर सध्या अमेरिकेच्या एका महिलेचा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे आणि यावरुन वादही रंगला आहे. याचं कारण असं की या महिलेनं स्वतःच अतिशय ग्लॅमरस पोज देत आणि ग्लॅमरस ड्रेस घालून एक फोटो शेअर केला आहे.. आता तुम्ही विचार करत असाल, की ग्लॅमरस पोजमध्ये फोटो काढण्यात चुकीचं काय. मात्र, या महिलेच्या मागेच एका कास्केटमध्ये तिच्या वडिलांचा मृतदेह ठेवलेला आहे (Glamourous pose infront of Fathers dead body) .

महिलेनं आपल्या वडिल्यांच्या मृतदेहाच्या समोरच उभा राहात हा फोटो क्लिक केला आहे. यामुळेच ती ट्रोल झाली आहे.

Shocking Video! खेळता खेळता झालं भांडण, छोट्या भावाने पेनच घुसवलं डोक्यात

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेनं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, इथूनच हा फोटो रेडिटवरील एक ग्रुपवर शेअऱ केला गेला. तेव्हापासूनच या महिलेची अनेकांनी निंदा केली. एका व्यक्तीनं म्हटलं, की महिलेचं वर्तन अतिशय असभ्य आणि चुकीचं आहे. दुसऱ्या एका व्यक्तीनं कमेंट करत लिहिलं, की हे अतिशय दुखःद आहे, कोणीतरी या महिलेला धडा शिकवायला हवा. पित्याच्या कास्केटवर अमेरिकेचा ध्वज दिसत आहे. यावरुन हा व्यक्ती सैन्यातील माजी जवान असावा असा अंदाज लावला जात आहे. अशात या महिलेनं केवळ आपल्या पित्याचाच नाही तर राष्ट्रध्वज आणि देशाचाही अपमान केल्याचं अनेकांनी म्हटलं. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, न्यूज १८ या गोष्टीची खात्री देत नाही की फोटोबाबत करण्यात आलेला दावा खरा आहे.

First published:

Tags: Shocking news, Viral news, Viral photo