जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking Video! खेळता खेळता झालं भांडण, छोट्या भावाने पेनच घुसवलं डोक्यात

Shocking Video! खेळता खेळता झालं भांडण, छोट्या भावाने पेनच घुसवलं डोक्यात

Shocking Video! खेळता खेळता झालं भांडण, छोट्या भावाने पेनच घुसवलं डोक्यात

भावा-भावांमधील वादाचा इतका भयंकर व्हिडीओ तुम्ही कधी पाहिला नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मोतिहारी, 25 ऑक्टोबर : भावा-बहिणींमधील (Brother Fighting) वाद हे काही नवे नाहीत. त्यातही भावा-भावांमधील वादात जितकी तीव्रता असते तितकी बहिणीसोबत होत नाही. भावामधील वादामुळे एका मुलाच्या डोक्यातच पेन घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे कुटुंबीयांनी डोक्यावर हातच मारून घेतला. सुदैवाने यात मुलाला फार दुखापत झाली नाही. (Shocking Video The fighting started while playing the younger brother inserted the pen in his head) मात्र रुग्णालयात जाऊन त्याच्या डोक्यात घुसलेला पेन काढावा लागला.  बिहारमधील (Bihar News) मोतिहारीमध्ये खेळत असताना वाद झाला आणि त्यानंतर छोट्या भावाने मोठ्या भावाला पेन मारण्याचा प्रयत्न केला. लहान भावाने पेन मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर घुसवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलाला मोतिहारी रुग्णालयात (Hospital) नेण्यात आलं. रुग्णालयात मुलाच्या डोक्यात अडकवलेला पेन ओढून काढण्यात आला. या दोन्ही भावांमध्ये झालेल्या मारहाणीमुळे अख्खं कुटुंब त्रस्त झालं आहे. पेनचा टोकदार भाग भावाच्या चेहऱ्याच घुसला. आणि ब्रेनच्या नसांना स्पर्श केला. मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आणि नंतर रक्त आत जमा झालं होतं. ज्यामुळे अधिक धोका वाढला होता.

त्यानंतर रुग्णालयात डॉक्टरांनी पहिल्यांदा मुलाला हायर सेंटरमध्ये रेफर केलं. मात्र रुग्णालयाचे अधीक्षकाची तत्परता आणि सर्जनच्या कुशलतेमुळे चेहऱ्यात अडकलेला पेन काढता येऊ शकतो. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात