मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'मला तुरुंगात डांबा पण बायकोसोबत नका ठेवू', वैतागलेल्या नवऱ्याची पोलिसांना कळकळीची विनंती

'मला तुरुंगात डांबा पण बायकोसोबत नका ठेवू', वैतागलेल्या नवऱ्याची पोलिसांना कळकळीची विनंती

बायकोला वैतागून घर सोडून नवऱ्याने थेट पोलीस ठाणं गाठलं.

बायकोला वैतागून घर सोडून नवऱ्याने थेट पोलीस ठाणं गाठलं.

बायकोला वैतागून घर सोडून नवऱ्याने थेट पोलीस ठाणं गाठलं.

रोम, 25 ऑक्टोबर : तसे बहुतेक पुरुष हे घराबाहेर कितीही रूबाब दाखवत असले, आपला धाडसीपणा दाखवत असले तरी घरात मात्र त्यांची काहीच चालत नाही. किती तरी पुरुष आपल्या पत्नीला घाबरतात (Husband and wife). पत्नी आपल्या पतीचा जाच करत असल्याचीही काही प्रकरणं आपल्याला माहिती आहेत (Husband fear wife). अशाच आपल्या पत्नीच्या भीतीने एका नवऱ्याने घर सोडून थेट पोलीस ठाणंच गाठलं (Husband reach police station). मला जेलमध्ये टाका पण बायकोसोबत ठेवू नका, अशी विनवणी हा पत्नीपीडित नवरा पोलिसांना करू लागला (Husband want jail instead of wife).

हे प्रकरण आहे इटलीतील (Italy). रोममध्ये (Rome) राहणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात शिक्षा झाली होती (Husband not want to live with wife). त्याला घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.ज्यामुळे त्याची बायको सतत त्याच्यासोबत असायची. बायकोसोबत राहणं त्याच्यासाठी खूप कठीण झालं होतं. खरंतर घरात नजरकैदेत राहणं ही त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असल्यासारखंच झालं. त्यामुळे कशीबशी ही व्यक्ती नजरकैदेतून सुटली. घरातून पळाली आणि थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. बाकी शिक्षा आपल्याला तुरुंगात काढायला देण्याची विनंती करू लागली.

हे वाचा - VIDEO - सासरी पोहोचताच नवरीला मोठा धक्का, दीरांनी जे केलं ते पाहून सर्व शॉक

रिपोर्टनुसार रोम पोलिसांनी सांगितलं की, ही व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि तुरुंगात टाकण्याची विनंती करू लागली. व्यक्तीने आपण पत्नीसोबत एकाच घरात नाही राहू शकत. जेलमध्ये राहण्यापेक्षाही पत्नीसोबत राहणं जास्त खतरनाक आहे, त्यामुळे आपल्याला गजाआड करा, अशी मागणी या व्यक्तीने केली. 

हे वाचा - Boyfriend च्या या विचित्र सवयीने तरुणी बेजार, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

ही व्यक्ती आपल्या बायकोच्या विचित्र मागणीला वैतागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने सांगितलं की त्याची पत्नी त्याला सेक्ससाठी जबरदस्ती करते, जे आता शक्य नाही. बायकोची इच्छा तो पूर्ण करू शकत नाही आणि मग त्याला वेगवेगळ्या पद्दतीने त्रास दिला जातो. त्यामुळे त्याला घराऐवजी तुरुंगात राहायचं आहे.

First published:

Tags: Italy, Wife and husband, World news