नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : चिप्स आणि बर्गर यासारख्या गोष्टींवरून लहान मुलांना अनेकदा भांडताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र, मोठं झाल्यानंतर या गोष्टींचा लोकांवर फारसा परिणाम होत नाही. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला एका जोडप्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी बटाट्याच्या चिप्सवरून भांडण केलं, तेही अशा पद्धतीने की प्रकरण कोर्टात पोहोचलं. डान्स करताना अचानक गेला तरुणाचा जीव, Live घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा Video डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना ऑस्ट्रेलियातील अॅडलेडची आहे. इथे एका जोडप्यामध्ये कोणती भेटवस्तू किंवा सोन्या-चांदीवरून नव्हे, तर फ्राईजच्या छोट्या तुकड्यावरून भांडण झालं. तुम्हाला वाचून थोडं विचित्र वाटेल, पण असंच काहीसं घडलं जेव्हा एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडवर रागावली. कारण त्याने तिच्या पोर्शनमधील बटाट्याचे चिप्स खाल्ले. अॅडलेड मॅजिस्ट्रेट कोर्टात मॅथ्यू फिन नावाच्या व्यक्तीने ही गोष्ट न्यायाधीशांना सांगितली. या 42 वर्षीय व्यक्तीने सांगितलं की त्याची गर्लफ्रेंड शार्लोटने चिकन आणि सॅलडचे पॅक विकत घेतले होते. मेलबर्न रस्त्यावरून जात असताना फिनने तिला चिप्स मागितलं. गर्लफ्रेंडजवळ असलेलं चिप्स घेताच ती भडकली. तिने फिनकडून केवळ चिप्स हिसकावून घेतले नाहीत, तर त्याला कारमधून उतरण्यास सांगितलं आणि त्याच्या अंगावर कार चढवण्याचा प्रयत्न केला. ट्रकमध्ये अडकलेल्या स्कुटीसोबत चिमुकल्याला 2KM पर्यंत फरफटत नेलं, Video पाहून उडेल थरकाप बॉयफ्रेंड फिनने हे प्रकरण कोर्टात नेलं आणि सांगितलं की विक्षिप्त प्रेयसीला त्याला मारायचं आहे. त्याच वेळी, गर्लफ्रेंड शार्लोट म्हणते की फिनने तिच्यावर हल्ला केला, त्यानंतर तिने कार थांबवली आणि त्याला बाहेर काढलं. इतकंच नाही तर तिला स्वत: पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी यायचं होतं, मात्र वाटेत तिची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला धडकली. प्रियकर म्हणतो की ती त्याला मारायला येत होती, पण तो वाचला. सध्या या प्रकरणाच्या सुनावणीनंतर शार्लेटला जामीन मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.