जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ट्रकमध्ये अडकलेल्या स्कुटीसोबत चिमुकल्याला 2KM पर्यंत फरफटत नेलं, Video पाहून उडेल थरकाप

ट्रकमध्ये अडकलेल्या स्कुटीसोबत चिमुकल्याला 2KM पर्यंत फरफटत नेलं, Video पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

एका ट्रकने एका दुचाकीला धडक दिली, हा ट्रक ड्रायव्हर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या दुचाकी चालकाला त्याच्या बाईकसह २ किलोमीटर फरफटत नेलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी : हल्ली रस्ते अपघाताशी संबंधीत अनेक व्हिडीओ समोर येत आहे. यांपैकी काही व्हिडीओ हे गंभीर दुखापतीचे आहेत, तर काही व्हिडीओ हे अक्षरश: अंगावर काटा आणणारे असतात. तसे पाहाता रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना खबरदारी घेणं केव्हाही चांगलं आहे. पण असं असलं तरी देखील कधी-कधी इतरांच्या चुकीमुळे देखील काही लोक अपघातांना बळी पडतात. अशावेळी जास्त काळजी घेतलेली केव्हा ही चांगली. पण सध्या एक रस्ते अपघाताचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. एका ट्रकने एका दुचाकीला धडक दिली, हा ट्रक ड्रायव्हर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या दुचाकी चालकाला त्याच्या बाईकसह २ किलोमीटर फरफटत नेलं. रस्त्याच्या मधोमध तरुणासोबत भयंकर अपघात, गाडीचा चुराचुरा Video धडकी भरवणारा या घटनेचा व्हिडीओ मागून येणाऱ्या एका बाईक चालकाने काढला. नंतर त्याने पुढे येऊन या ट्रक ड्रायव्हरला सांगून ट्रक रोखण्यासाठी सांगितले पण तो ड्रायवर काही ट्रक थांबवायला तयार नव्हता. ही घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील आहे. जी पाहून कोणाचाही आत्मा हादरेल. भरधाव वेगात आलेल्या डंपरने स्कुटीला धडक दिली आणि तिला फरफट पुढे घेऊन आला या घटनेमुळे गाडीवर असलेले आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, स्कूटीवर सहा वर्षांचा मुलगा (नातू) अडकला आणि बाईकसोबत दोन किमीपर्यंत फरफटत गेला.

जाहिरात

निवृत्त शिक्षका आपल्या नातवाला घेण्यासाठी बाईकवरुन बाहेर पडला मिळालेल्या माहितीनुसार, आजोबा उदित नारायण (67) आणि त्यांचा नातू सात्विक (06) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हमीरपूर चुंगी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक उदित नारायण हे आपल्या नातवाला स्कूटवरुन शाळेतून आणण्यासाठी गेले होते, तेव्हा घरी परतत असताना कानपूर-सागर मार्गावर भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली.

News18लोकमत
News18लोकमत

ट्रकच्या पुढे अडकलेली मुले व स्कूटी या धडकेनंतर आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सहा वर्षांचा सात्विक आणि स्कूटी डंपरच्या पुढच्या भागात अडकले. यावेळी आरोपी डंपर चालकाने वेग वाढवला. डंपरखाली अडकलेल्या स्कूटीतून ठिणग्या बाहेर पडत होत्या, मात्र चालकाने डंपर थांबवला नाही. यानंतर लोकांनी डंपरचा पाठलाग केला. अखेर सहा वर्षाच्या सात्विकचाही मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात