जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सोबत जगण्या-मरण्याचं दिलं वचन; पण एका लॉटरीनं बदललं मन, प्रियकराचं गर्लफ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य

सोबत जगण्या-मरण्याचं दिलं वचन; पण एका लॉटरीनं बदललं मन, प्रियकराचं गर्लफ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य

आपल्याला कोणीही कामापुरतं महत्त्व देतं आणि त्यानंतर आपल्या भावनांचा विचार करत नाही, असं लक्षात आल्यानंतर सर्वांनाच त्रास होतो. घरच्या लोकांकडूनही हे होत असतं. अनेकदा लोक आपल्याला गृहीत धरत असल्यामुळे हे होतं. कारण त्यांच्या कोणत्याही वेळेला आपण त्यांच्यासाठी available राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यामुळे आपलीच किंमत कमी होते. तुम्हालाही असंच काही वाटत असेल तर, सर्वप्रथम तुमच्या स्वभावात काही बदल घडवून आणा.

आपल्याला कोणीही कामापुरतं महत्त्व देतं आणि त्यानंतर आपल्या भावनांचा विचार करत नाही, असं लक्षात आल्यानंतर सर्वांनाच त्रास होतो. घरच्या लोकांकडूनही हे होत असतं. अनेकदा लोक आपल्याला गृहीत धरत असल्यामुळे हे होतं. कारण त्यांच्या कोणत्याही वेळेला आपण त्यांच्यासाठी available राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यामुळे आपलीच किंमत कमी होते. तुम्हालाही असंच काही वाटत असेल तर, सर्वप्रथम तुमच्या स्वभावात काही बदल घडवून आणा.

महिलेनं मॅरिसकडे लॉटरीतील अर्धा हिस्सा मागितला आहे. तिचं असं म्हणणं आहे की या जॅकपॉटवर तिचाही अर्धा अधिकार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 डिसेंबर : पैशापुढे नाती हरल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. यात आता आणखी एका घटनेनं भर पाडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने 35 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली (Man Wins 35 Crore Lottery). यानंतर त्याने आपल्या पार्टनरलाच सोडून दिलं. यानंतर डेनिस रॉबर्टसन (Denise Robertson) नावाच्या या महिलेनं आपला एक्स पार्टनर मॅरिस थिबॉल्ट (Maurice Thibeault) याच्याविरोधात कायदेशीर अॅक्शन घेतली. महिलेनं मॅरिसकडे लॉटरीतील अर्धा हिस्सा मागितला आहे. तिचं असं म्हणणं आहे की या जॅकपॉटवर तिचाही अर्धा अधिकार आहे. यासोबतच महिलेनं आपल्या एक्सपासून वेगळं होण्यासाठी कायदेशीर लढाही सुरू केला आहे. कारण तिचा असा दावा आहे की मॅरिसने तिला धोका दिला आहे. हे प्रकरण कॅनडामधील आहे. VIDEO: प्रेयसी सोडून गेल्याने भावुक झाला युवक; मग गर्लफ्रेंडला अशी घडवली अद्दल डेली स्टार यूकेमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, या महिलेनं कायदेशीररित्या आपल्या एक्स पार्टनरपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेनं सांगितलं की दोघांनी मिळून असा निर्णय घेतला होता की दर आठवड्याला निघणारी लोटो लॉटरी ते सोबतच खरेदी करतील आणि कोणाला लॉटरी लागल्यास ती अर्धी वाटून घेतील. यासोबतच या पैशांनी एक चांगलं घर खरेदी करून दोघंही आनंदाने सोबत राहतील. मात्र लॉटरी लागताच सगळं अगदी उलटं घ़डलं. मॅरिसने लॉटरी लागताच डेनिसला तिचा हिस्सा देण्यास नकार दिला. कॅनडाच्या कायद्यानुसार ते दोघंही अशा नात्यात होते, ज्यात दोघांना विवाहाचे समान अधिकार होते. डेनिसला एक मुलगीही आहे आणि त्या दोघीही 2017 पासून मॅरिससोबत राहात होते. सोळाव्या वर्षी केलं आयुष्यातील पहिलं जेवण, आतापर्यंत जगत होती फक्त दोन गोष्टींवर डेनिसच्या वकिलांनीही सांगितलं की दोघांमध्ये असंच ठरलं होतं की त्यांच्यातील कोणीही लॉटरी जिंकली तर आपल्या पार्टनरसोबत अर्धी रक्कम शेअर करावी लागेल. त्यांनी सांगितलं की आपल्या नात्याच्या सुरुवातीपासूनच दोघंही लॉटरीचं तिकिट खरेदी करत आहेत. यादरम्यान दोघांच्या पैशांनीच लॉटरीचं तिकिट विकत घेतलं जात असे. मात्र आता मॅरिस आपल्या पार्टनरला ठरल्याप्रमाणे हिस्सा देण्यास नकार देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात