जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / सोळाव्या वर्षी केलं आयुष्यातील पहिलं जेवण, आतापर्यंत जगत होती फक्त दोन गोष्टींवर

सोळाव्या वर्षी केलं आयुष्यातील पहिलं जेवण, आतापर्यंत जगत होती फक्त दोन गोष्टींवर

सोळाव्या वर्षी केलं आयुष्यातील पहिलं जेवण, आतापर्यंत जगत होती फक्त दोन गोष्टींवर

आयुष्यात पहिली सोळा वर्षं कुणी जेवलंच नव्हतं, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही घटना प्रत्यक्षात घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 26 डिसेंबर: एका तरुणीनं (Young girl) जन्मानंतर थेट वयाच्या सोळाव्या वर्षीच (At the age of 16) जेवण (Meal) केल्याची एक घटना सध्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांचं वजन आणि ते घेत असलेला आहार यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे वजन कमी करणे किंवा वाढवणे या दोन्ही बाबींसाठी खाण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात येतं. खाणं नियंत्रित करून वजनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. मात्र जर एखाद्याला खाणंच नकोसं वाटत असेल, खाण्याचा त्रास होत असेल, तर त्याचं काय करायचं? एका तरुणीला नेमकी हीच समस्या तब्बल 16 वर्षं भेडसावत आहे.   अठरा महिन्यांत झाला होता आजार ग्रेसी रॉड नावाच्या एका मुलीला ती केवळ दीड वर्षांची असताना एक आजार जडला होता. त्यात तिची खाण्यावरची वासना पूर्णतः उडाली आणि परत आलीच नाही. त्यामुळे ग्रेसी सामान्य मुलांप्रमाणे अन्नच खात नसे. तिला रोजच्या जेवणात केवळ चीज स्प्रेड आणि ब्रेड एवढाच मेन्यू असायचा. घरात एखादा कार्यक्रम असेल आणि बरेच पाहुणे येणार असतील तरी ग्रेसीसाठी मात्र ब्रेड आणि स्प्रेड चीज हे दोनच पदार्थ तयार केले जात आणि तिला खाऊ घातले जात. इतर पदार्थांची ऍलर्जी ग्रेसीला जेव्हा चीज आणि ब्रेड याव्यतिक्त इतर पदार्थ दिले जात, तेव्हा तिचं मानसिक स्वास्थ्य बिघढत असे. ते ठिक करण्यासाठी तिला पुन्हा स्प्रेड चिज आणि ब्रेडच द्यावा लागे. त्यामुळे दीड वर्षांची असल्यापासून ते वयाची सोळा वर्षं होईपर्यंत ती केवळ आणि केवळ याच दोन पदार्थांवर जगत होती.   हे वाचा -

केलं जेवण ग्रेसीला असणाऱ्या अन्नाच्या ऍलर्जीवर तिला मानसोपचार देण्यात आले आणि जेवण करायला ती तयार झाली. नुकतंच तिने चिकन, पुडिंग्ज, रोस्टिंग्ज आणि गाजर असं भरपेट जेवण केलं. हे जेवण तिने पचवलं असून हळूहळू तिची अन्नाबाबतची मतं बदलत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: food , health
  • First Published :
जाहिरात
जाहिरात