मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: प्रेयसी सोडून गेल्याने आधी भावुक झाला युवक; मग दुसऱ्याच दिवशी गर्लफ्रेंडला अशी घडवली अद्दल

VIDEO: प्रेयसी सोडून गेल्याने आधी भावुक झाला युवक; मग दुसऱ्याच दिवशी गर्लफ्रेंडला अशी घडवली अद्दल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपली प्रेयसी सोडून गेल्याने (Breakup) हा तरुण अतिशय भावुक होऊन तिच्यासाठी मेसेज रेकॉर्ड करतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपली प्रेयसी सोडून गेल्याने (Breakup) हा तरुण अतिशय भावुक होऊन तिच्यासाठी मेसेज रेकॉर्ड करतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपली प्रेयसी सोडून गेल्याने (Breakup) हा तरुण अतिशय भावुक होऊन तिच्यासाठी मेसेज रेकॉर्ड करतो

नवी दिल्ली 27 डिसेंबर : इंटरनेटवर दररोज निरनिराळे व्हिडिओ समोर येत राहतात. यातील अनेक व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. हे व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका प्रियकराचा (Viral Video of a Lover) आहे. आपली प्रेयसी सोडून गेल्याने तो प्रचंड दुखावला आहे.

सोळाव्या वर्षी केलं आयुष्यातील पहिलं जेवण, आतापर्यंत जगत होती फक्त दोन गोष्टींवर

त्याची अवस्था पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. यानंतर तो आपल्या एक्स गर्लफ्रेंडला संदेश देताना दिसतो. तो आपल्या एक्ससाठी एक मेसेज रेकॉर्ड करतो. मात्र पुढच्याच क्षणी व्हिडिओमध्ये जे काही होतं, ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपली प्रेयसी सोडून गेल्याने (Breakup) हा तरुण अतिशय भावुक होऊन तिच्यासाठी मेसेज रेकॉर्ड करतो (Message for Ex Girlfriend). तो आपल्या गर्लफ्रेंडचं नाव घेऊन म्हणतो, 'गोल्डी तू जिथे राहशील तिथे आनंदी राहा. मला माहिती आहे, तू कोणासोबत तरी फिरायला नक्कीच गेली असशील. व्हॅलेंटाईन डे नक्कीच साजरा केला असशील. आता तुझा प्रियकरही नक्कीच असेल. मला माहितीये तू मला सोडलं.' यादरम्यान हा तरुण अतिशय इमोशनल झाल्याचं दिसतं.

पुढच्याच क्षणी फ्रेममध्ये जे काही पाहायला मिळतं ते थक्क करणारं आहे. पुढे तुम्ही पाहू शकता की हाच तरुण दुसऱ्या मुलीसोबत दिसतो. हा तरुण दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये येतो. या फ्रेममध्ये हा तरुण अतिशय आनंदात दिसतो. यानंतर तो पुन्हा एकदा एक मेसेज रेकॉर्ड करतो. या तो म्हणतो 'गोल्डी तू निघून गेली. माझ्या दुःखावर मलम लावणारी चंपा मिळाली. हिच्यावर मी खूप प्रेम करतो.'

रोमँटिक डेट सुरु असतानाच आली अनोळखी व्यक्ती, महिलेचा चेहऱ्याचा उडाला रंग

या व्हिडिओदरम्यान बॅकग्राऊंडला 'ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी' हे गाणं वाजतं. हा व्हिडिओ black_lover__ox नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. (न्यूज १८ लोकमत या व्हिडिओच्या वास्तविकतेची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ एखाद्या प्रँकचा भागही असू शकतो)

First published:

Tags: Breakup, Girlfriend