मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पत्नीनं सतत खोटं बोलून पतीला बनवलं मानसिक रूग्ण; बँक खात्यातून लंपास केले 4 कोटी रूपये

पत्नीनं सतत खोटं बोलून पतीला बनवलं मानसिक रूग्ण; बँक खात्यातून लंपास केले 4 कोटी रूपये

महिलेनं आपल्या पतीच्या अकाऊंटमधून 4 कोटी 44 लाख रुपयाहून अधिक रक्कम हळूहळू काढून घेतली

महिलेनं आपल्या पतीच्या अकाऊंटमधून 4 कोटी 44 लाख रुपयाहून अधिक रक्कम हळूहळू काढून घेतली

महिलेनं आपल्या पतीच्या अकाऊंटमधून 4 कोटी 44 लाख रुपयाहून अधिक रक्कम हळूहळू काढून घेतली

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : पती-पत्नीचं नातं (Husband Wife Relationship) हे विश्वासाचं असतं. अशात जर पत्नीनंच आपल्या पतीचा विश्वासघात केला तर आयुष्य अतिशय कठीण होऊन जातं. कनेक्टिकटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचं आयुष्य त्याच्या पत्नीनं इतकी खराब केलं की आर्थिक स्थितीसोबतच त्याचं मानसिक आरोग्यही बिघडलं.

बॉयफ्रेंड आंधळा असल्याने अतिशय आनंदी आहे ही तरूणी; सांगितले 5 मोठे फायदे

डोना मॅरिनो (Donna Marino) नावाच्या या महिलेनं आपल्या पतीच्या अकाऊंटमधून 4 कोटी 44 लाख रुपयाहून अधिक रक्कम हळूहळू काढून घेतली (Wife Stolen Money from Bank Account of Husband). जेव्हा पती या पैशांबद्दल विचारत असे तेव्हा ही महिला त्याला इतकं कन्फ्यूज करायची की हळूहळू त्याचा आपल्या स्मरणशक्तीवरील विश्वासच उठला (Woman Convinces Husband Has Alzheimer’s). या महिलेनं आपल्या पतीच्या पेन्शन चेक, कॉम्पेनसेशल पेमेंट्स आणि सोशल सिक्यूरिटी इनकमधून 20 वर्षांपर्यंत 4 कोटी 44 लाख रुपयांहून अधिक रक्कम चोरली.

पत्नीच्या हातातच पतीच्या सर्व आर्थिक गोष्टींची जबाबदारी होती त्यामुळे ती गुपचूप पैसे चोरत असे. तिनं पतीला असं भासवून दिलं की त्याला विसरण्याचा आजार आहे. पती बँकेत जाण्यासाठी निघताच पत्नी त्याला सांगे की मागील वेळी तू तुझ्या अल्झायमर्समुळे तिथे गोंधळ घातला होतास. त्यामुळे आता तू तिथे नाही जायला पाहिजे. पतीनं आपल्या या आजाराबाबत कधीच डॉक्टरकडे चौकशी केली नाही. मात्र, पत्नी वारंवार म्हणत असल्याने त्याने विश्वास ठेवला की आपल्याला अल्जायमर्स आहे.

VIDEO : जमिनीच्या तुकड्यावरुन दोन गटांमध्ये खुनी संघर्ष; महिलांनाही मारहाण

या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीच्या कांडचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा त्याच्या मुलीनं या व्यक्तीचे फायनॅनशियल डिटेल पाहिले. या व्यक्तीला आपल्या क्रेडिट कार्डपासून ते अकाऊंटमधून झालेल्या ट्रान्जेक्शबद्दल काहीही माहिती नव्हती. प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर हे समोर आलं की डोना मॅरिनोनं पतीच्या अकाऊंटमधून पैसे काढून आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले होते. चौकशीत तिनं सांगितलं, की आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करण्यासाठी ती हे करत होती. सध्या महिलेवर फ्रॉडचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पतीनंही तिला घटस्फोट दिला आहे.

First published:

Tags: Shocking news, Wife and husband