मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉयफ्रेंड आंधळा असल्याने अतिशय आनंदी आहे ही तरूणी; सांगितले 5 मोठे फायदे

बॉयफ्रेंड आंधळा असल्याने अतिशय आनंदी आहे ही तरूणी; सांगितले 5 मोठे फायदे

एक महिला आपल्या आंधळ्या बॉयफ्रेंडमुळे अतिशय खूश आहे. तिचं असं म्हणणं आहे, की तो कसा दिसतो याचा काहीही फरक पडत नाही. मात्र तो आंधळा आहे याचे अनेक फायदे आहेत

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : तरुणींना आपल्या पार्टनरकडून अनेक वेगवेगळ्या अपेक्षा असतात. बॉयफ्रेंड (Boyfriend) असो किंवा पती प्रत्येक पुरुष आपल्या पार्टनरवर (Restriction of Partner) पूर्ण लक्ष ठेवत असतो. अशात महिलांना या गोष्टींपासून मोकळं राहायचं असतं. एका महिलेनं आंधळा बॉयफ्रेंड बनवला आणि तिनं सांगितलं की बॉयफ्रेंड आंधळा असल्याचे काय काय फायदे होतात (Benefits of Blind Boyfriend). या महिलेनं आपला एक व्हिडिओ बनवून टिकटॉकवर (Tiktok Video) पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये महिलेनं आंधळ्या बॉयफ्रेंडचे पाच मोठे फायदे सांगितले.

द सनच्या वृत्तानुसार, एक महिला आपल्या आंधळ्या बॉयफ्रेंडमुळे अतिशय खूश आहे. तिचं असं म्हणणं आहे, की तो कसा दिसतो याचा काहीही फरक पडत नाही. मात्र तो आंधळा आहे याचे अनेक फायदे आहेत. निया एस्पेरांजाने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की ती आपल्या पार्टनरच्या आंधळेपणाला निगेटिव्ह नाही तर फायद्याचं का समजते. नियाने सांगितलं की तिनं हा व्हिडिओ बनवण्याआधी आपल्या पार्टनरची परवानगी घेतली आहे आणि ती दररोज आपल्या या पार्टनरसोबत व्हिडिओ बनवत असते.

नियाने आपल्या व्हिडिओमधून आंधळ्या बॉयफ्रेंडचे पाच फायदे सांगितले.

पहिला फायदा - तो कधीच दुसऱ्या मुलींकडे बघत नाही.

दुसरा फायदा - मी कशी दिसते याचा त्याला काहीच फरक पडत नाही आणि मला माझे केसही व्यवस्थित करावे लागत नाहीत.

तिसरा फायदा - माझा बॉयफ्रेंड पाहू शकत नसल्याने त्याच्यापासून गिफ्ट लपवून ठेवण्याची गरज मला पडत नाही.

चौथं कारण - त्याला कधी समजत नाही की मी त्याला माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत आहे.

पाचवं कारण - सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे तिला कधीच बॅकसीट ड्रायव्हिंग करावी लागत नाही.

हा व्हिडिओ नियाने शूट करून टिकटॉकवर अपलोड केला. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, तुझा ह्यूमर अतिशय सुंदर आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, तुला असं वाटतंय का की आंधपणा एक वरदान आहे? ही अतिशय रंजक बाब आहे.

First published:

Tags: Love story, Video Viral On Social Media