मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरुणांना फसवून डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक

तरुणांना फसवून डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक

48 वर्षीय महिला लॉरा ऑगलेस्बी हिने आपली 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेज हिचं ओळखपत्र चोरलं. जेणेकरून तिला आपल्या मुलीला मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेता यावा.

48 वर्षीय महिला लॉरा ऑगलेस्बी हिने आपली 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेज हिचं ओळखपत्र चोरलं. जेणेकरून तिला आपल्या मुलीला मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेता यावा.

48 वर्षीय महिला लॉरा ऑगलेस्बी हिने आपली 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेज हिचं ओळखपत्र चोरलं. जेणेकरून तिला आपल्या मुलीला मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेता यावा.

नवी दिल्ली 11 डिसेंबर : जेव्हा एखादी तरुणी किंवा तरुण कॉलेजमध्ये अॅडमिशन (College Admission) घेतात तेव्हा त्यांची ओळख म्हणून कॉलेजकडून त्यांना आयडी कार्ड (Identity Card) दिलं जातं. अनेक देशांमध्ये तर ओळखपत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक सोयीही दिल्या जातात, ज्याचा त्यांना अभ्यासात फायदा होतो. मात्र, तुम्ही कधी असं प्रकरण ऐकलं आहे का की एखाद्या विद्यार्थ्याचं ओळखपत्र चोरून तिसऱ्यानेच या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या सुविधांचा आनंद घेतला. कदाचित आजपर्यंत तुम्ही असं कधीही ऐकलं नसेल मात्र अमेरिकेतून अशीच एक अजब घटना समोर आली आहे. यात एका आईनेच आपल्या मुलीचं ओळखपत्र चोरलं (Mother Stole Daughter’s ID to Date Men). यानंतर जे काही घडलं ते अतिशय धक्कादायक होतं.

हेही वाचा - इवल्याशा कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO

अमेरिकेच्या मिसूरी येथे राहणारी 48 वर्षीय महिला लॉरा ऑगलेस्बी हिने आपली 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेज हिचं ओळखपत्र चोरलं. जेणेकरून तिला आपल्या मुलीला मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेता यावा. तिच्या आईला कॉलेजमध्य जाऊन तरुणांसोबत रोमान्स करायचा होता. तिनं हे सर्व 2016 साली सुरू केलं, जेव्हा ती 43 वर्षाची होती. तेव्हा लॉरा आरकंसासमध्ये राहात होती.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, मिसूरीमधील वेस्टर्न डिस्ट्रिक्ट यूएस अटॉर्नी ऑफिसने सांगितलं की लॉराला तिच्या मुलीचं ओळखपत्र मेलच्या माध्यमातून मिळालं. याचा वापर करत तिने मिसूरीचं ड्रायव्हिंद लायसन्स बनवलं. यानंतर ती मिसूरीमधीलल माउंटन व्ह्यू या छोट्या शङरात शिफ्ट झाली. तिने आपल्या मुलीचं नाव आणि वय चोरलं. म्हणजेच ओळखपत्राच्या माध्यमातून ती लॉरेन हेज बनली. यादरम्यान तिने हे दाखवलं की ती साउथ वेस्ट बॅपटिस्ट यूनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी आहे, जी ग्रंथालयात काम करते. पोलिसांनी सांगितलं की यादरम्यान तिने अनेक तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. या सर्वांना वाटत होतं की महिला २२ वर्षाची आहे.

हेही वाचा - 5 वर्षांच्या लेकीच्या खेळण्यात सापडलं असं काही की पाहताच हादरली आई

शहरात राहणाऱ्या एका कपलने महिलेला आपल्याकडे राहण्याची परवानगीही दिली. या कपलने पोलिसांना सांगितलं, की महिला स्वतःला २२ वर्षाची तरुणी सांगत असे आणि 17 वर्षीय मुलीप्रमाणे वागत. ती आपण अगदी साधंभोळं असल्याचं दाखवत असे, यामुळे लोक सहज तिच्यावर विश्वास ठेवत आणि तिच्या जाळ्यात अडकत. हे जाणून तुम्हीही हैराण व्हाल की महिलेने आपल्या मुलीच्या नावावर तब्बल 19 लाख रुपये उधार घेतले होते. आता तिला पकडण्यात आलं असून पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. तिला विद्यापीठासोबतच आपल्या मुलीलाही नुकसान भरपाई म्हणून 13 लाखहून अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Shocking news