नवी दिल्ली 17 मे : जगात दररोज हजारो, लाखो दरोडे आणि चोरीच्या घटना घडतात. सोशल मीडियावर चोरांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते पाहिल्यानंतर नक्कीच आश्चर्य वाटतं. चोर फक्त संधी शोधतात आणि संधी मिळताच चोरी करून लंपास होतात, असं बोललं जातं. चोरी रात्रीच्या अंधारातच होते असं नाही, कधी कधी चोर दिवसाच्या उजेडात तर कधी लोकांच्या गर्दीतही चोरी करून फरार होतात. सध्या एका चोरीच्या घटनेचा असाच एक व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
VIDEO- उतावळ्या नवऱ्याने मंडपातच नवरीबाईला...; बिच्चारीला शेवटी लपवावं लागलं तोंड
व्हिडिओमध्ये एका महिलेनं दुकानात अगदी उघडपणे चोरी केल्याचं दिसतं (Woman Thief Stole a Purse). चोरीची ही पद्धत पाहून अगदी मोठमोठे चोरही चक्रावून जातील. दुकानात चोरी करणारी ही महिला चोरीनंतर फरारही झाली. मात्र, तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एका दुकानात खूप गर्दी आहे. लोकांना सामान घेण्याची घाई आहे. इतक्यात ती महिला चोर तिथे येते आणि स्वतः बिल भरत असल्याचं नाटक करू लागते. यादरम्यान गर्दीचा फायदा घेत ती वारंवार शेजारी उभा असलेल्या महिलेला धक्का देत राहाते. काहीच सेकंदात समजतं की तिच्या शेजारी असलेल्या महिलेच्या बॅगेत नोटांनी भरलेली पर्स आहे. यानंतर ही चोर महिला अतिशय हुशारीने नकळतपणे या महिलेची पर्स बाहेर काढते. यानंतर ती पर्स आपल्या बॅगेत टाकून तिथून निघून जाते.
आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्ध महिलेचा जबरदस्त Skipping rope Video
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. ज्याला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे.. हा व्हि़डिओ पाहून लोक शॉक झाले असून कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिलं की, यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. आणखी एका यूजरने लिहिलं की, 'हा व्हि़डिओ शिकवतो की कोण कधी आणि कुठून येऊन चोरी करेल, हे कोणीही सांगू शकत नाही.' याशिवाय इतरही काहींनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Thief