Home /News /viral /

VIDEO- उतावळ्या नवऱ्याने मंडपातच नवरीबाईला...; बिच्चारीला शेवटी लपवावं लागलं तोंड

VIDEO- उतावळ्या नवऱ्याने मंडपातच नवरीबाईला...; बिच्चारीला शेवटी लपवावं लागलं तोंड

भरमंडपात सर्वांसमोर नवरदेवाने नवरीबाईसोबत असं काही केलं की तिला लाज वाटली.

  मुंबई, 16 मे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो (Wedding Video) . नवरा-नवरीमध्ये लग्नाचा आनंद, उत्साह असतोच (Bride Groom Video). पण काही लोक असे असतात ज्यांचा हा उत्साह इतका की उत्साहाच्या भरात ते काहीही करतात. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका उतावळ्या नवरदेवाने भरमंडपातच नवरीबाईसोबत असं काही केलं की तिच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली. उतावळा नवरदेव गुडघ्या बाशिंग अशी म्हण आपल्याला माहितीच आहे. या नवरदेवाला ही म्हण खऱ्या अर्थाने लागू पडते. नवरीबाईला पाहताच त्याचा स्वतःवरील ताबा सुटला. आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या या नवरदेवाने सर्वांसमोर तिच्यासोबत जे केलं ज्यामुळे नवरीबाई लाजेने गुलाबी झालीच. पण तिने आपलं तोंडही हाताने झाकून घेतलं. व्हिडीओत पाहू शकता नवरदेव आधीपासूनच मांडवात आहे. नवरीबाईची एंट्री होते. नवरी हळूहळू चालत मंडपाच्या दिशेने येत असते. तिच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. नवरीबाईला पाहताच नवरदेवाला काही राहवत नाही. कधी एकदा नवरी जवळ येते असं त्याला झालं होतं. तो ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचीही प्रतीक्षा करू शकला नाही. त्याने आपण कुठे आहोत, आपल्या आजूबाजूला कोण आहे याची कशाचीच पर्वा केली नाही. तो थेट तिच्याकडेच धावत गेला. तिला सर्वांसमोर आपल्या दोन्ही हातात उचललं आणि स्टेजकडे घेऊन आला.
  नवरदेवाचं हे कृत्य पाहून सर्वजण शॉक झाले. नवरीलाही थोडा वेळ काय झालं ते कळलंच नाही. नवरदेवाने सर्वांसमोर असं केल्याने ती लाजली. तिने आपलं तोंडच हाताने लपवून घेतलं. नवरदेव तिला काही वेळ तसाच आपल्या हातात घेऊन उभा होता. काही वेळाने त्याने तिला खुर्चीवर बसवलं. पण नवरी इतकी लाजली होती की तिला इतरांना आपलं तोंड दाखवावंसं वाटत नव्हतं. ती मान खाली घालून तशीच राहिली. हे वाचा - किचनमध्ये अचानक लागली आग, महिला विझवायला गेली पण शेवटी...; थरकाप उडवणारा LIVE VIDEO @official_viralclips इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा लग्नाचा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे. असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यात नवरदेव भरमंडपात असं काही करतात की नवरीबाई लाजेने गुलाबी झालेल्या दिसतात.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या