नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन (National War Memorial Anniversary) साजरा करण्यात आला. यावेळचा एक भावनिक व्हिडिओ आता समोर आला. नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देण्यासाठी एक महिला आली होती, पण जेव्हा तिने मेमोरियलमध्ये आपल्या भावाचं नाव पाहिलं तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले (Woman Started Crying After Seeing Brother’s Name in National War Memorial). महिलेचा हा व्हिडिओ (Emotional Video) तिच्या पतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Russia Ukraine War : एकमेकांना निरोप देताना ढसाढसा रडू लागले; बापलेकीचा Video
शगुन नावाची एक महिला दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी आली होती. मात्र देशासाठी प्राण देणार्या शहीद जवानांच्या यादीत आपला भाऊ कॅप्टन संब्याल यांचं नाव पाहिल्यावर तिला रडू कोसळलं. याचा भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राष्ट्रीय युद्ध स्मारक स्वतंत्र भारताच्या सशस्त्र संघर्षात लढलेल्या भारतीय सैन्याच्या सैनिकांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी बांधलं गेलं आहे. या स्मारकात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सुपुत्रांची नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत. शगुन संब्याल यांच्या पतीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आज आम्ही अचानक दिल्लीला जाण्याचा प्लॅन केला. सुरुवातीला आम्ही कनॉट प्लेसला फिरलो आणि त्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हटलं की चल आपण नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देऊ’
सोपी शिकार समजून गरूडाने केला सापावर हल्ला; पण बाजी पलटली अन्…, Shocking Video
त्यांनी पुढे लिहिलं की, ‘मी तिथे अंकती विक्रम बत्रा आणि मेजर अजय सिंग जसरोटिया यांच्या नावांचे फोटो काढत असताना माझ्या पत्नीला तिच्या भावाचं नाव तिथे दिसलं. शगुनला अचानक आपल्या भावाचं नाव स्मारकात सापडलं आणि तिने मला हाक मारली.’ शगुन यांच्या पतीने आपल्या पत्नीची एक भावनिक व्हिडिओ क्लिपही इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.