जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सोपी शिकार समजून गरूडाने केला सापावर हल्ला; पण बाजी पलटली अन्..., पाहा Shocking Video

सोपी शिकार समजून गरूडाने केला सापावर हल्ला; पण बाजी पलटली अन्..., पाहा Shocking Video

सोपी शिकार समजून गरूडाने केला सापावर हल्ला; पण बाजी पलटली अन्..., पाहा Shocking Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक गरूड आकाशात उडत असतं, इतक्यात त्याची नजर जमिनीवर असलेल्या एका सापावर पडते. सापाला सोपी शिकार समजून गरूड त्याच्यावर हल्ला करतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत असतात. कधी या प्राण्यांचे क्यूट व्हिडिओ लोकांची मनं जिंकतात तर कधी दुसऱ्या प्राण्यांवर केलेल्या हल्ल्याचे हैराण करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक गरूड सापावर हल्ला करतो, मात्र पुढे जे काही घडतं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की गरूडाने सोपी शिकारी समजून सापावर हल्ला केला (Snake and Eagle Fight) मात्र डाव गरूडावर पालटला.. यामुळेच असं म्हटलं जातं की आपल्या शत्रूला कधीच कमी समजू नका. रस्त्यातच होऊ लागल्या प्रसूती वेदना अन् मग..;Cab Driverने जे केलं ते मन जिंकणारं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक गरूड आकाशात उडत असतं, इतक्यात त्याची नजर जमिनीवर असलेल्या एका सापावर पडते. सापाला सोपी शिकार समजून गरूड त्याच्यावर हल्ला करतं. मात्र, त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटतो. गरूडाने सापावर हल्ला करताच साप गरुडाच्या पंजाला आपल्या शरीराने वेढा घालतो. दोघांमध्ये बराच वेळ संघर्ष सुरूच राहातो.

जाहिरात

अखेर गरूड हा लढाईत हार मानतो आणि स्वतःच्या बचावासाठीच प्रयत्न करू लागतो. बराच काळ गरूड सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, मात्र तरीही त्याला यश येत नाही. अखेर शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीने गरूडाला सापाच्या तावडीतून वाचवलं आणि लगेचच गरूडाने आकाशात झेप घेतली. OMG! आकाशात उडता उडता पक्ष्याने केली कोल्ह्याची शिकार; VIDEO पाहून थक्क व्हाल व्हायरल होणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 31 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यावर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ भारतासह इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात