यूक्रेन 25 फेब्रुवारी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Russia Ukraine War) व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियन सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत. रशियन सैन्य युक्रेनच्या शहरांमधील लष्करी तळांना लक्ष्य करून हल्ले करत आहे. यासोबतच युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचं झाल्यास, गुरुवारी 24 फेब्रुवारीला सकाळी झालेल्या पहिल्या हल्ल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याठिकाणचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या याठिकाणचा एक इमोशनल व्हिडिओ व्हायरल (Emotional Video of Ukrainian Father) होत आहे. जो पाहून तुम्हीही क्षणभर भावुक व्हाल. Russia Ukraine War: जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी पुन्हा खरी! 2014 मधील Tweet Viral आपल्या सर्वांना माहिती आहे की युद्ध ही एक भयावह परिस्थिती असते, जिथे लोकांचं आपले स्वतःचे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवणं हे एकमेव काम असतं. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक वडील बसमध्ये बसून आपल्या मुलाचा निरोप घेत आहेत. यावेळी वडील आणि मुलीचे डोळे पाणावलेले आहेत.
@lil_whind नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी देईपर्यंत 8 लाखांहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडीओला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं की, ‘युक्रेनियन बाप आपल्या कुटुंबाचा निरोप घेताना, तो रशियासोबत लढण्यासाठी पुढे जात आहे.’ भावुक करणाऱ्या या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. युक्रेनमध्ये सायकलस्वारावर तोफगोळा पडतानाचा थेट Live Video अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यावर इमोशनल कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, देवाने या पित्याचं आणि यूक्रेनचं रक्षण करावं. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, देवा करो आणि हा व्यक्ती लवकरच पुन्हा आपल्या कुटुंबीयांकडे येवो. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं की खरंच हे दृश्य अतिशय हृदयद्रावक आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.