जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका हेअरस्टाईलसाठी खर्च केले हजारो रूपये; आरशात चेहरा पाहताच शॉक होऊन रडू लागली तरुणी

एका हेअरस्टाईलसाठी खर्च केले हजारो रूपये; आरशात चेहरा पाहताच शॉक होऊन रडू लागली तरुणी

एका हेअरस्टाईलसाठी खर्च केले हजारो रूपये; आरशात चेहरा पाहताच शॉक होऊन रडू लागली तरुणी

या तरुणीने हेअरस्टाईलसाठी तब्बल 20 हजार रूपये खर्च केले होते (woman paid 20 thousand Rupees for hairstyle). मात्र केसांसोबत भलतंच काही होऊन बसलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 मार्च : काही विशेष कार्यक्रमांमध्ये जाताना आपण सुंदर तयार होऊन जावं असं सगळ्यांना वाटतं. यामुळे लोक सहसा स्वतःला करता येणाऱ्या गोष्टीही एक्सपर्टकडून करून घेण्याला प्राधान्य देतात. जेणेकरून कोणतीही कमी राहू नये आणि सगळं एकदम परफेक्ट असावं. मात्र प्रत्येकवेळी आपल्या प्लॅनिंगप्रमाणेच सगळं होईल, असं नाही. MBBS च्या विद्यार्थ्याने कॉपीसाठी सर्जरी करून याठिकाणी बसवलं Bluetooth Device एका टिकटॉक यूजरसोबतही असंच घडलं. तिने परफेक्ट लूक मिळवण्यासाठी जास्त पैसे खर्च केले मात्र यानंतर जो काही रिझल्ट तिला पाहायला मिळाला त्यामुळे ती अक्षरशः रडायला लागली. कारण यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी तिचा लूक अतिशय विचित्र दिसू लागला (Woman Spent 20 Thousand Rupees for Worse Hairstyle). या तरुणीने हेअरस्टाईलसाठी तब्बल 20 हजार रूपये खर्च केले होते (Woman Paid 20 Thousand Rupees for Hairstyle). मात्र केसांसोबत भलतंच काही होऊन बसलं. आपलं हे दुःख तिने टिकटॉकवर शेअर केलं आहे.

News18

आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा अनुभव महिलेनं शेअर केला. यात ती फोटोच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेल्या ब्लंडरची कथा सांगितली. तिथे आपल्या हेअरस्टाईलसाठी हेअर ड्रेसरला 20 हजार रूपये दिले. इतकंच नाही तर आनंदात तिने या ब्यूटिशियनला काही टीपही दिली. मात्र घरी आल्यावर जेव्हा तिने स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. तिचे हेअरस्टाईल अतिशय वाईट झालेली होती.

महिलेला आपल्याच घरात दिसला सिक्रेट दरवाजा; आतमधील दृश्य पाहून झाली थक्क

महिलेनं दावा केला की सलूनमधून बाहेर येण्याआधी तिने हेअर स्टाईलची किंमत आणि स्टायलिस्टची टीप मिळून 22,526 रुपये खर्च केले होते. तिने आपल्या केसांमध्ये एक एक्सटेन्शन करून साथी आणि सुंदर पोनीटेल बनवण्यास सांगितलं होतं. मात्र घरी येऊन जेव्हा तिने स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा ती रडू लागली. अखेर तिला आपल्या आईची मदत घेऊन आपले केस व्यवस्थित करावे लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात