नवी दिल्ली 01 मार्च : जुन्या घरांमध्ये अनेकदा अशा काही वस्तू मिळतात ज्याबद्दल मालकांनाही माहिती नसतं. आपल्या जुन्या घरासोबत लोकांच्या भावना नेहमी जोडलेल्या असतात आणि जेव्हा या घरातील जुन्या वस्तू इतर लोकांना सापडतात तेव्हा याबद्दल जाणून आश्चर्य वाटतं. नुकतंच अमेरिकेतील एका महिलेसोबतही असंच घडलं. तिला आपल्या घरामध्येच एक सिक्रेट दरवाजा आढळला (Woman Found Secret Room in House). यात तिला हैराण करणाऱ्या गोष्टी आढळल्या. VIDEO - फक्त एक पाय राहिल इतकीच जागा; चिमुकलीसाठी CISF जवानाने लावली जीवाची बाजी द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, एना प्रिलामॅनने जेव्हा वर्जिनियाच्या रिचमंडमध्ये घर खरेदी केलं तेव्हा याबद्दल माहिती नव्हतं की या घरात काही गुपितंही आहेत. ती आपली पाळीव कुत्र्यासोबत राहात होती. एक दिवस ती आपल्या घरातील सफाई करत होती. तेव्हा तिला घरात एक गुप्त दरवाजा मिळाला. दरवाजा उघडताच आतमध्ये तिला एक कपाट दिसलं. यात लव्ह लेटर होते (Woman Found Love Letters of Old Couple in Secret Room). WTVR-TV च्या रिपोर्टनुसार, तिला कपाटात दोन डबे आढळले, ज्यात शेकडो चिठ्ठ्या होत्या. जेव्हा तिने या चिठ्ठ्या वाचल्या तेव्हा तिला समजलं की यात प्रेमपत्र आहेत. रिपोर्टनुसार, या चिठ्ठ्या बेटी सू नावाच्या महिलेला वँन्स नावाच्या एका व्यक्तीने लिहिल्या होत्या. त्यात पूर्ण वाक्य लिहिली गेली होती आणि त्यातील इंग्रजीही चांगली होती. तारखेवरुन तिला समजलं की हे लेटर अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. चिठ्ठीवरुन तिला समजलं की दोघंही जॉन मार्शल हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यात अनेक खासगी गोष्टी होत्या त्यामुळे तिने या चिठ्ठ्या पुढे वाचल्या नाहीत. एनाने असं ठरवलं की ती कपलच्या एखाद्या नातेवाईकाला ही पत्रे पाठवणार. मोठ्या उत्साहात छातीवर काढला असा टॅटू आता तोंड लपवण्याची वेळ; पाहताच ढसाढसा रडली बराच शोध घेतल्यानंतर तिला ऑरिगॉनच्या एका 30 वर्षाच्या डॅल्टन लॉन्गबद्दल समजलं. तो या कपलचा नातू होता. त्याने सांगितलं की वॅन्स आणि बेटीने लग्न केलं आणि ५० वर्ष एकमेकांसोबत राहिले. लॉन्गने सांगितलं की तो एनाच्या घरातच लहानाचा मोठा झाला, मात्र त्याला लेटरबद्दल माहिती नव्हतं. आता लॉन्गकडे ते पत्र पाठवले जातील. या पत्रांमुळे कपलच्या लव्ह स्टोरीबद्दल समजलं त्यामुळे एना अतिशय भावुक झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.