जाहिरात
मराठी बातम्या / Viral / MBBS च्या विद्यार्थ्याने केली हद्द पार, कॉपी करण्याकरता सर्जरी करून याठिकाणी बसवलं Bluetooth Device

MBBS च्या विद्यार्थ्याने केली हद्द पार, कॉपी करण्याकरता सर्जरी करून याठिकाणी बसवलं Bluetooth Device

MBBS च्या विद्यार्थ्याने केली हद्द पार, कॉपी करण्याकरता सर्जरी करून याठिकाणी बसवलं Bluetooth Device

एका तरुणाने आपल्या जीवाचीही पर्वा न करता कॉपी करण्यासाठी जीवघेणा प्रयोग केला (MBBS Student used Bluetooth for Cheating in Exam). मात्र शेवटी तो पकडला गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 मार्च : कॉलेज किंवा शाळेमध्ये अभ्यास केला नाही तर विद्यार्थी कॉपी करण्याचा पर्याय निवडतात. कॉपी करण्यासाठी जगभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कधी एखाद्या परीक्षेसाठी तर कधी सहज नोकरी मिळवण्यासाठी याचा आधार घेतला जातो. मात्र यासाठी काही लोक अगदी हद्द पार करतात. मध्य प्रदेशच्या इंदूरमधून अशीच एक अजब घटना समोर आली आहे, जी सर्वांनाच हैराण करणारी आहे. यासाठी एका तरुणाने आपल्या जीवाचीही पर्वा न करता कॉपी करण्यासाठी जीवघेणा प्रयोग केला (MBBS Student used Bluetooth for Cheating in Exam). मात्र शेवटी तो पकडला गेला. महिलेला आपल्याच घरात दिसला सिक्रेट दरवाजा; आतमधील दृश्य पाहून झाली थक्क ही घटना मध्यप्रदेशच्या इंदूरमधील एमजीएम मेडिकल कॉलेजची आहे. यात एमबीबीएसच्या जुन्या बॅचचे दोन विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. परीक्षा देताना दोघांच्या अजब हालचाली पाहून त्यांच्यावर संशय आला. तपास केला असता दोघांकडे मोबाईल फोन आढळले. मात्र हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका विद्यार्थ्याने कॉपी करण्यासाठी मायक्रो ब्लूट्यूथ डिवाईस सर्जरी करून आपल्या कानाच फीट केल्याचं समोर आलं. या तरुणाचं म्हणणं आहे, की लोकांना हे डिवाईस बाहेरून दिसू नये, यासाठी त्याने असं केलं. या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा फ्लाईंग स्क्वायडने परीक्षा केंद्रात छापा मारला. यावेळी टीमला एका विद्यार्थ्याकडे मोबाईल सापडला. मोबाईल एका ब्लूट्यूथ डिवाईसला कनेक्ट होता. बराच तपास तरूनही ब्लूटूथ डिवाईस टीमच्या हाती लागलं नाही. यानंतर विद्यार्थ्याकडे चौकशी सुरू केली. काही वेळानंतर या फायनल ईअरच्या विद्यार्थ्याने स्वतःच खुलासा केला की त्याने मायक्रो ब्लूट्यूथ डिवाईस सर्जरी करून आपल्या कानात फीट केलं होतं. विद्यार्थ्याने याच्या परिणामाचा विचारही न करता हे जीवघेणं पाऊल उचललं. भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने हे यासाठी केलं कारण त्याच्याकडे ही परीक्षा देण्याची शेवटची संधी होती. विद्यार्थी मागील ११ वर्षांपासून ही परीक्षा देत होता. मात्र तो पास होत नव्हता. त्याच्याकडे ही अखेरची संधी होती. यामुळे त्याने हा पर्याय शोधला. सध्या या दोन्ही विद्यार्थ्यांविरोधात केस दाखल करण्यात आली असून एमजीएम कॉलेजला नोटीस पाठवण्यात आली आहे. कॉलेजच्या डीनने सांगितलं की या घटनेची संपूर्ण माहिती डीएवीवीला दिली गेली असून विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात