मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्लॅटफॉर्मवरच तरुणाच्या पाठीवर बसली महिला अन्...; VIDEO पाहून संतापले नेटकरी, काय आहे प्रकरण?

प्लॅटफॉर्मवरच तरुणाच्या पाठीवर बसली महिला अन्...; VIDEO पाहून संतापले नेटकरी, काय आहे प्रकरण?

सध्या एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. यात एक तरुणी एका मुलालाच आपली खुर्ची बनवून त्याच्या पाठीवर बसलेली दिसत आहे.

सध्या एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. यात एक तरुणी एका मुलालाच आपली खुर्ची बनवून त्याच्या पाठीवर बसलेली दिसत आहे.

सध्या एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. यात एक तरुणी एका मुलालाच आपली खुर्ची बनवून त्याच्या पाठीवर बसलेली दिसत आहे.

नवी दिल्ली 20 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा अजब फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Weird Photos and Videos) होताना दिसतात, जे पाहून लोक आपलं वेगवेगळं मत बनवतात. काही फोटो तर असे असतात जे पाहून नेटकऱ्यांचा सोशल मीडियावरच वाद सुरू होतो. सध्या असाच एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. यात एक तरुणी एका मुलालाच आपली खुर्ची बनवून त्याच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. विशेष बाब म्हणजे हा फोटो रेल्वे स्टेशनच्या (Railway Station) सबवे प्लॅटफॉर्मवरील आहे. हा फोटो व्हायरल झाल्यापासूनच नेटकऱ्यांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

अजबच आहे! महिलेने ऑनलाइन ऑर्डर केलं स्पर्म; आणि मग e-baby चा झाला जन्म

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर @sti1es नावाच्या यूजरनं हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या व्हिडिओवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. सगळ्यात आधी या घटनेचा फोटो सबवे क्रीचर्स नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. फोटोमध्ये दिसतं, की एक मुलग आपले हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून प्लॅटफॉर्मवर बसला आहे आणि मुलगी त्याच्या पाठीवर बसलेली आहे.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, की "मी ऐकलं की पुरुषांमधील शिष्टाचार संपला आहे." लोक या कॅप्शनला पसंती देत आहेत आणि मुलीवर टीका करत आहेत. काही लोकांनी म्हटलं, की मुलीने हे करायला नको होते, तर काही लोकांनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

'मला माझा बाप्पा परत द्या', चिमुरडी मुलं हमसून हमसून रडली, VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, ही टिकटॉकर मुलाच्या पाठीवर बसून व्हिडिओ शूट (Woman Sits on Boy to Shoot Tiktok Video) करत होती. प्लॅटफॉर्मवर इतरही लोक उपस्थित होते, जे हे सर्व पाहत होते. व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगी अॅक्सेस स्ट्रीट नावाच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा आहे. हा व्हिडिओ अमेरिकेच्या मॅनहॅटन येथील आहे. मुलीनं हा व्हिडिओ पोस्ट करत जे कॅप्शन दिलं आहे, त्यात तिनं हा मुलगा आपली बॉय चेअर (Boy Chair) असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरनं लिहिलं, की कदाचित या मुलीच्या पायाला काहीतरी दुखापत झाली असेल, त्यामुळे या मुलानं तिला आपल्या पाठीवर बसवलं असेल. मात्र, तरीही तिनं जमिनीवर बसायला हवं होतं. तर, काही यूजर्सने लिहिलं, की दोघांनीही व्हिडिओला अधिक व्ह्यूज मिळावे यासाठी असं केलं आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Video Viral On Social Media