• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अजबच आहे! महिलेने ऑनलाइन ऑर्डर केलं स्पर्म; आणि मग e-baby चा झाला जन्म

अजबच आहे! महिलेने ऑनलाइन ऑर्डर केलं स्पर्म; आणि मग e-baby चा झाला जन्म

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

महिला सध्या खूप आनंदात आहे. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाल्याचं तिने सांगितलं.

 • Share this:
  इंग्लंड, 19 सप्टेंबर : ही घटना ब्रिटेनमधील ( incident took place in the UK) ननथॉर्प येथील आहे. 'डेली स्टार' च्या एका बातमीनुसार, येथे राहणाऱ्या एका 3 वर्षी स्टेफनी नावाच्या महिलेने आपल्या पतीला घटस्फोट दिला होता. महिला आणि तिच्या पतीला एक मुलगादेखील आहे. महिलेला आणखी एक मूल हवं होतं. मात्र पतीपासून वेगळी झाली असल्याने तिने नवा रस्ता शोधला. दुसरीकडे महिलेला दुसऱ्या रिलेशनशीपमध्येही जायचं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेकडे इतके पैसे नव्हते की रुग्णालयात जाऊन ती आयव्हीएफ (IVF) करू शकेल. ही प्रक्रिया खूप खर्चिक असते. शेवटी महिलेने सर्व माहिती एकत्र केली आणि आपल्या काही मित्रांना याबाबत सांगितलं. शेवटी स्टेफनीने एक पद्धत शोधून काढली. तिने एका बेबी अॅपच्या माध्यमातून स्पर्म ऑर्डर केलं. याशिवाय तिने एक इनसेमिनेशन किट मागवलं. (Woman orders sperm online And then the e baby was born) जोपर्यंत या दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ पोहोचत नाही, तोपर्यंत महिलेने युट्यूब आणि अन्य ठिकाणांवरुन याच्या वापराबाबत माहिती जमा केली. स्पर्म बुक केल्यानंतर स्पर्म डोनर स्वत: तिच्या घरापर्यंत आला व तिला स्पर्म देऊन गेला. यानंतर महिलेने इनसेमिनेशन किटच्या माध्यमातून स्पर्मचा वापर केला. पहिल्याच प्रयत्नात महिलेची गर्भधारणा (pregnant women) झाली होती. यानंतर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हे ही वाचा-भारतातील रहस्यमयी ‘बर्म्युडा ट्रँगल’; इथे जाणारा व्यक्ती कधीच परत का येत नाही? महिलेचं म्हणणं आहे की, हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. ही एक प्रकारे ऑनलाइन बेबी आहे. महिला याबाबत म्हणाली की, जर तिच्याकडे इलेक्ट्रॉनिक साधनं नसती तर ती अशा प्रकारे कधीच आई होऊ शकली नसती. आश्चर्य म्हणजे महिलेला कोणत्या ही रुग्णालयात दाखल व्हावं लागलं नाही. सध्या महिला खूप आनंदात आहे. महिलेला तिच्या आवडीचा स्पर्म डोनर मिळाल्याचा आनंदही तिने व्यक्त केला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: