मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : हल्ला करण्यासाठी मगर समोर येताच महिलेनं काढली पायातली चप्पल अन्...; पाहा पुढे काय झालं

VIDEO : हल्ला करण्यासाठी मगर समोर येताच महिलेनं काढली पायातली चप्पल अन्...; पाहा पुढे काय झालं

मगरीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Crocodile) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

मगरीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Crocodile) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

मगरीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Crocodile) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : मगर हा एक असा प्राणी आहे ज्याला पाहून जंगलाचा राजा असलेला सिंहदेखील आपला रस्ता बदलतो. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याची सुटका होण्याची शक्यता जवळपास संपलेली असते. याच कारणामुळे ज्या नदीत मगरी आढळतात त्यापासून दूरच राहण्यात सगळे आपलं भलं समजतात. कारण मगर नदीतून बाहेर निघूनही शिकार करते. सध्या मगरीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Crocodile) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की एक मगर आपल्याकडे येत असल्याचं पाहून महिला जे काही करते ते सर्वांनाच हैराण करणारं आहे.

दानपेटी चोरण्याआधी देवाच्या पाया पडला अन्..; ठाण्यातील चोरीचा अजब VIDEO

हा व्हिडिओ NBA चे आधीचे प्लेअर असलेले रेक्स चॅपमॅन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Video) शेअर केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत (Pet Dog) नदीच्या कडेला फिरत आहे. इतक्यात कुत्र्याची शिकार करण्यासाठी दोन मगरी अगदी वेगात महिलेच्या दिशेने येतात. मगरींना पाहून महिलाही सावध होते. हैराण करणारी बाब म्हणजे मगर आपल्याकडे येत असल्याचं पाहून ही महिला थोडंही घाबरत नाही. ती अतिशय आरामात आपल्या पायातील चप्पल काढते आणि मगरीला तिथून पळवून लावण्यासाठी चप्पल उगारते. विशेष म्हणजे मगरही महिलेच्या चपलेला घाबरते आणि पाण्यात परत जाते.

हा मजेशीर व्हिडिओ सर्वात आधी ट्विटवर Fred Schultz नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत यूजरनं कॅप्शन दिलं, प्रत्येकाला माहिती आहे की जेव्हा आई पायातील चप्पल काढते तेव्हा काय होतं. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 16 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

जगातील सर्वात 'Premature Baby’ होऊन या बाळाने रचला इतिहास; 21व्या आठवड्यात जन्म

हा व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, कुत्र्याला याची अजिबातही कल्पना नव्हती की तो मगरीची शिकार बनवण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, सर्वात मजेदार भाग तो होता जेव्हा महिला आपला पाय उचलून चप्पल काढते. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, वाह...मगरीला घाबरवण्यासाठी महिलेनं चपलीचा अगदी हत्याराप्रमाणे वापर केला.

First published:

Tags: Crocodile, Shocking video viral