नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की कोणतंही काम करण्याआधी देवाचा आशिर्वाद घेणं गरजेचं आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की केवळ सामान्य लोकच नाही तर चोरदेखील चोरी करण्याआधी देवाचा आशिर्वाद घेतात (Thief Touches Feet of God’s Idol). असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे . हा व्हिडिओ ठाण्याच्या नौपाडा येथील आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की हा चोर अजब आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Temple Theft Video) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. यात एक चोर मंदिरातील दानपेटी चोरताना दिसतो. VIDEO : बापरे! थेट घरातच घुसली मगर; नंतर जे घडलं ते एकदा पाहाच! व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मंदिरात जातो आणि चारही बाजूंना बघतो. यानंतर तो देवाच्या पाया पडतो आणि मग मंदिरातील दानपेटी घेऊन तिथून फरार होतो. फुटेज पाहून असं वाटतं की त्याचा दुसरा साथीदारही मंदिराच्या बाहेर त्याची वाट पाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना तेव्हा घडली जेव्हा पुजारी मंदिरातून बाहेर गेले होते. ते परत आले तेव्हा दानपेटी गायब होती. पुजाऱ्यानं सांगितलं की दानपेटीत एक हजार रुपये होते.
30 सेकंदाचा हा व्हिडिओ फेसबुकवर Rationalist नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, दानपेटी चोरण्याआधी चोर देवाच्या पाया पडला. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले होते तर अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की हा चोर चोरी करण्याआधी माफी मागत आहे. नक्कीच त्याला पैशांची फार गरज असेल म्हणून तो मंदिरातून चोरी करत आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, की मला तर हा चोर अतिशय निर्मळ मनाचा दिसत आहे. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. VIDEO: प्रेयसीनं लग्नाला दिला नकार; तरुणाने GFच्या घरासमोरूनच काढली वरात अन्… या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं, की ही चोरी मंदिराच्या आसपास राहणाऱ्या परिसरातीलच कोणीतरी केली आहे. कारण स्थानिक लोकांनाच हे माहिती असतं की कोणत्या वेळी मंदिरात कोणीच नसतं. सध्या अनेक स्थानिक लोकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ दाखवण्यात आला. यातून संशयित आरोपीबद्दल अनेक पुरावे मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी केजस म्हसदे (18) याला अटक करण्यात आली आहे.