मराठी बातम्या /बातम्या /Viral /जगातील सर्वात 'Premature Baby’ होऊन या बाळाने रचला इतिहास; 21व्या आठवड्यात जन्म

जगातील सर्वात 'Premature Baby’ होऊन या बाळाने रचला इतिहास; 21व्या आठवड्यात जन्म

या बाळाचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

या बाळाचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

या बाळाचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : आपलं बाळ एकदम निरोगी, छान असावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. त्यासाठीच गर्भधारणेचे पूर्ण दिवस भरणं गरजेचं असतं. वेळेआधी जन्माला आलेली अनेक बालकं काही कारणानं मृत्युमुखी पडतात. अपुऱ्या दिवसांच्या बाळांची काळजी घेणं, त्यांना सांभाळणं अत्यंत अवघड असतं. त्या बाळावर उपचार करणारे डॉक्टर आणि त्याच्या आई-वडिलांसाठी हा अत्यंत कसोटीचा काळ असतो. अशा अवघड परिस्थितीतून अपुऱ्या दिवसांचं बाळ जगलं तर त्याचा आनंद अगदी वेगळा असतो. अशाच प्रकारे अगदी अपुऱ्या दिवसांच्या एका बाळाला वाचवण्यात यश आलंय. 'NDTV इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    अमेरिकेत जन्मलेल्या कार्टिस मिन्स (Curtis Means) या बाळाचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) नोंदवण्यात आलं आहे. फक्त 21 आठवडे आणि एका दिवसाचा असताना कार्टिसचा जन्म झाला. (World’s Most Premature Baby Alive) जगातलं जिवंत राहिलेलं सर्वांत कमी दिवसांचं बाळ म्हणून त्याची गिनेस बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अलाबामामध्ये जन्मलेल्या कार्टिसचं वजन अवघं 420 ग्रॅम होतं. कार्टिसची तब्येत आता एकदम उत्तम आहे आणि तो 16 महिन्यांचा आहे. त्याच्या जगण्यात अनेक अडथळे होते; पण ते पार करून जिवंत राहिलेलं सर्वांत अपुऱ्या दिवसांचं बाळ असा विश्वविक्रम त्याच्या नावावर नोंदवण्यात आला आहे, असं गिसेज वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने (Guinness World Records) स्पष्ट करण्यात आलं आहे.

    हे ही वाचा-22 मजली इमारतीच्या छतावर चढून चिमुकल्यांचा भयंकर स्टंट, थरकाप उडवणारा VIDEO

    कार्टिसची आई मिशेल बटलरनं जुळ्या मुलांना जन्म दिला होता; पण त्यातल्या फक्त कार्टिसचाच जीव वाचू शकला. 2020 च्या जुलै महिन्यात प्रसववेदना जाणवू लागल्यावर मिशेलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मिशेलनं अपुऱ्या दिवसांच्या जुळ्या बाळांना (Premature Twins) म्हणजे कार्टिस आणि सीअस्याला जन्म दिला. जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी सीअस्याचा मृत्यू झाला.

    कार्टिस तोंडाने श्वास घेऊ शकत नव्हता किंवा दूधही पिऊ शकत नव्हता. अथक प्रयत्नांनी डॉक्टरांनी त्याला या दोन्ही गोष्टी शिकवल्या. कार्टिस आता दीड वर्षांचा होत आला आहे; पण त्याला आजही सप्लिमेंटल ऑक्सिजन आणि एका फीडिंग ट्यूबची गरज आहे.

    जन्माच्या वेळेस कार्टिसचं वजन अर्ध्या किलोपेक्षाही कमी होतं. अर्थात डॉक्टरांमुळेच बाळ वाचलं आणि आता ते पूर्णपणे निरोगी आहे. अलाबामामध्ये एका वर्षापूर्वी कार्टिस मिन्सचा जन्म झाला. सहसा बाळाचा जन्म नवव्या किंवा दहाव्या महिन्यातही होतो; पण कार्टिसचा जन्म फक्त पाचव्या महिन्यात (म्हणजे 21 आठवड्यांत) झाला. म्हणजेच सर्वसामान्य बाळांपेक्षा 19 आठवडे आधी कार्टिसचा जन्म झाला.

    इतक्या अपुऱ्या दिवसांचं बाळ जगण्याचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असतं आणि कार्टिस त्याच सुदैवी बाळांपैकी आहे. कार्टिस अनेक दिवस आयसीयूमध्ये (ICU) आहे. जवळपास तीन महिने कार्टिस व्हेंटिलेटरवर होता. तब्बल 275 दिवसांनंतर कार्टिस हॉस्पिटलमधून बाहेर पडला. अर्थातच त्याच्या अडचणी संपलेल्या नाहीत.

    आपलं बाळ मृत्यूला हरवून परत आलं याचा आनंद त्याच्या आईला किती झाला असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी... कार्टिसच्या बाबतीत ते अगदी खरं ठरलं.

    First published:
    top videos

      Tags: Pregnancy, Small baby