नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : जगात टॅलेन्टेड लोकांची कमी नाही. सोशल मीडियावर सतत अशा लोकांचे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय खास असतात तर काही इतके हैराण करणारे असतात की त्यावरुन आपली नजरही हटत नाही. हे व्हिडिओ असे असतात जे पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी ज्या पद्धतीनं पायाने तिरंदाजी (Archery Video) करते ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
भयंकर! भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, तोडले लचके; पाहा VIDEO
टॅलेंडेट लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तर एक दिवस ते सोशल मीडियावर चर्चेत येतातच. उद्योगपती हर्ष गोयनका यांनी अशाच एका तिरंदाजी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे. ही तरुणी ज्या पद्धतीनं आपल्या हातावर उभा राहात पायाने तिरंदाजी करते (Woman Shooting Arrow With Her Feet) ते पाहून कोणीही हैराण होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ही तरुणी लोखंडाच्या रॉडवर हात ठेवून उभा राहते. तिच्या पायात धनुष्यबाण आहे. यानंतर ती जळणारा बाण यात अडकवून अचूक निशाणा साधते.
Would be a great idea if the Olympic torch is lit like this…. pic.twitter.com/acfOVCIipA
— Harsh Goenka (@hvgoenka) November 7, 2021
या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. कारण लोखंडाच्या रॉडवर बॅलन्स बनवून तरुणीनं ज्या पद्धतीनं अचूक निशाणा साधला आहे, ते सर्वांनाच शक्य नाही. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
वाढदिवशी भावांनी दिलं सरप्राईज, डोळ्यात आलं पाणी; पाहा Emotional Video
ट्विटरवर ७ नोव्हेंबरला शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर १० हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की १३०० हून अधिकांनी तो रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.