मराठी बातम्या /बातम्या /देश /भयंकर! भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, तोडले लचके; पाहा VIDEO

भयंकर! भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, तोडले लचके; पाहा VIDEO

भटक्या कुत्र्यांनी एका लहान (Stray dogs attack small girl video goes viral) मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवत आहे.

भटक्या कुत्र्यांनी एका लहान (Stray dogs attack small girl video goes viral) मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवत आहे.

भटक्या कुत्र्यांनी एका लहान (Stray dogs attack small girl video goes viral) मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवत आहे.

अलिगढ, 9 नोव्हेंबर: भटक्या कुत्र्यांनी एका लहान (Stray dogs attack small girl video goes viral) मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवत आहे. विद्यापीठाच्या कँपसमध्ये फिरत असलेल्या या मुलीवर अचानक तीन भटके (Stray dog attacks girl in university campus) कुत्रे हल्ला करतात. काही कळायच्या आतच तिला खाली पाडतात आणि तिचे लचके तोडतात, असं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा आणि थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. " isDesktop="true" id="628845" >

चिमुकलीवर केला हल्ला

हा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कँपसमधील. या व्हिडिओत एक मुलगी भटक्या कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पळून चाललेली दिसते. तीन भटके कुत्रे तिचा पाठलाग करतात आणि तिच्या अंगावर झेप घेत तिला खाली पाडतात. त्यानंतर ते कुत्रे तिच्या शरीराचे लचके तोडू लागतात. कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे घाबरलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागते. मात्र तीन कुत्र्यांनी एकदम हल्ला चढवल्यामुळे ती प्रतिकार करू शकत नाही. कुत्र्यांपुढे तिची एकटीची ताकद तोकडी पडते. मात्र तरीही जीवाच्या आकांताने ती ओरडत राहते आणि मदतीची याचना करत राहते.

महिलेने केली मदत

मुलीच्या किंकाळ्या ऐकून याच परिसरातून जाणारी एक महिला पुढे येते आणि लगबगीनं कुत्र्यांना हाकलून देत या मुलीची सुटका करते. महिला धावून येत असल्याचं पाहून भटके कुत्रे घाबरतात आणि तिथून पळ काढतात. त्यामुळे मुलीचा जीव वाचतो, असं या व्हिडिओत दिसतं. महिलेनं वेळेत धाव घेत भटक्या कुत्र्यांना हुसकावल्यामुळेच मुलीचा जीव वाचतो. तरीही ही महिला मदतीला येईपर्यंत कुत्र्यांनी मुलीला जखमी करून तिचे ठिकठिकाणी लचके तोडल्याची माहिती आहे. या मुलीला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हे वाचा-रणबीर-आलिया फॅन्ससाठी Bad News: लग्न ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

भटक्या कुत्र्यांची दहशत

महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात भटक्या कुत्र्यांची दहशत असल्याचं दिसून आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून प्रशासनानं कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Dog, Uttar paredesh, Video viral