मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वाढदिवशी भावांनी दिलं सरप्राईज, डोळ्यात आलं पाणी; पाहा Emotional Video

वाढदिवशी भावांनी दिलं सरप्राईज, डोळ्यात आलं पाणी; पाहा Emotional Video

एका व्यक्तीला त्याच्या भावांनी असं (Brothers give surprise to a man on his birthday gets emotional) काही सरप्राईज गिफ्ट दिलं की व्यक्तीच्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं.

  • Published by:  desk news

एका व्यक्तीला त्याच्या भावांनी असं (Brothers give surprise to a man on his birthday gets emotional) काही सरप्राईज गिफ्ट दिलं की व्यक्तीच्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं. आपली भावंडं आणि नातेवाईक हा (Viral video of brothers and sisters relation) अऩेकांसाठी वीक पॉइंट असतो. कामानिमित्त किंवा इतर काही कारणांसाठी नातेवाईकांपासून लांब राहणाऱ्यांना जेव्हा नातेवाईक भेटतात, तेव्हा त्यांना आभाळ ठेंगणं झाल्याचे अनुभव आल्याचं आपण अऩेकदा पाहतो. असाच अनुभव नुकताच एकाला आला.

वाढदिवसानिमित्त सरप्राईज भेट

फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा साठावा वाढदिवस होता. त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या भावांनी प्लॅन केला आणि त्याला कुठलीही पूर्वसूचना न देता त्याच्या घरी धडक दिली. जेव्हा त्यांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. दरवाजा उघडल्यानंतर समोर आपल्या भावंडांना पाहून ही व्यक्ती आनंद आणि आश्चर्यानं डोक्याला हात लावते आणि खाली बसते, असं दिसतं. त्यानंतर इतर सगळे जवळ जाऊन त्याची गळाभेट घेत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. आपल्या भावाचा साठावा वाढदिवस लक्षात ठेऊन त्याच्या भावांनी आणि बहिणींनी हा प्लॅन केला आणि घरात एकट्या असलेल्या व्यक्तीला अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्यानं आसमान ठेंगणं झाल्याचा अनुभव आला.

वाढदिवशी झाला इमोशनल

Goodnewscorrespondant या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत वाढदिवस असलेली व्यक्ती मोबाईलवर एक व्हिडिओ पाहून भावनिक होताना दिसते. डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू पुसता पुसता ही व्यक्ती व्हिडिओ पाहत असल्याचं रेकॉर्डिंग या व्यक्तीच्या मुलीनं तिच्या मोबाईलमध्ये केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या हा व्हिडिओ नेटिझन्समध्ये जोरदार व्हायरल होत असून त्यावर अनेक उत्तमोत्तम कमेंट्स येत आहेत.

हे वाचा- शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत पोहोचले राज्यपालांच्या भेटीला, 'हे' आहे कारण

प्रेक्षकही झाले भावुक

नात्यांची उब काय असते, हे दाखवणारा हा व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने या व्हिडिओवर नोंदवली आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपणही भावूक झाल्याचं दुसऱ्यानं म्हटलं आहे.

First published:

Tags: Birthday celebration, Viral video.