नवी दिल्ली 27 मार्च : बदल्या काळासोबत लोकांचे विचारही भरपूर बदलत आहेत. 21 व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसतात. घरापासून नोकरीपर्यंत अगदी प्रत्येक गोष्ट महिला पुरुषांच्या बरोबरीने सांभाळताना दिसतात. मात्र याचा अर्थ असाही नाही की पुरुषांनी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्याच विसराव्या. एका महिलेनं आपलं हेच दुःख मम्सनेटच्या माध्यमातून शेअर केलं (Weird Relationship). यात तिने आपल्या 12 वर्षांपासून सोबत असलेल्या जोडीदाराच्या बेजबाबदार कृत्यांबद्दल सांगितलं. या नात्यात राहून तिने एकतर्फी खर्च कसा केला हे या महिलेनं सांगितलं. पण आता विभक्त होण्याच्या काळात तिच्या प्रियकराने तिला सर्व हिशेब मागायला सुरुवात केली. त्यामुळे महिलेने सोशल प्लॅटफॉर्म मम्सनेटवर तिची व्यथा मांडली आणि लोकांना त्याबद्दल त्यांचं मत विचारलं. यानंतर शेकडो लोकांनी तिच्या प्रियकराच्या वागण्याबद्दल संताप व्यक्त केला. नवऱ्याच्या निधनानंतर 4 वर्षांनी समजलं की पती देत होता धोका; महिलेनं शेअर केली अजब घटना समानतेच्या लढ्यात ही महिला आणि तिचा जोडीदार यांच्यात काहीही समान राहिलं नाही. जबाबदारी नाही, माणुसकी नाही आणि खर्चाची विभागणीही नाही. सर्व काही एकट्या महिलेनंच सांभाळलं. यात तिला समुद्राच्या पाण्यात पाण्याचे काही थेंब टाकावे, इतकीच मदत आपल्या प्रियकराकडून मिळाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या प्रियकराकडे नेहमीच कमी क्रेडिट स्कोर आणि कमी पैसे होते, त्यामुळे तिलाच सर्व खर्च उचलावा लागला. पहिली ५ वर्षे दोघेही महिलेच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मग नवीन मोठे घर घेण्याची वेळ आली तेव्हा प्रियकराच्या कमी क्रेडिट स्कोअरमुळे त्याला अगदी स्वस्त मालमत्ता घ्यावी लागली. नवीन घरात 6 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान, व्यक्तीने काही प्रमाणात घरखर्चाचा वाटा उचलला परंतु पूर्ण नाही. सुट्ट्या, रेस्टॉरंट याची बिलंही नेहमीच महिलेनं भरली. कुटुंब नियोजनाचा प्रश्न आला तरीही महिलेनं स्वत: तिच्या आयव्हीएफसाठी पैसे दिले. चक्क 91 वर्षाच्या महिलेशी संसार थाटून ‘हा’ व्यक्ती बनला करोडपती, परंतु… आता जेव्हा दोघं वेगळं झाले, तेव्हा तो एक्स पार्टनरच तिला आपल्या आतापर्यंतच्या खर्चाचा हिशेब सांगू लागला आणि 12 वर्षांमध्ये त्याने खर्च केलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम तिला मागितली. मात्र खरंतर महिलेलाच या नात्यात जास्त जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या होत्या. मम्सनेटवर हा किस्सा ऐकून लोकांनी असं मत दिलं की, जर तुमचं लग्न झालं नवहतं तर तुझ्या वस्तू, मालमत्ता आणि बँक बॅलन्सवर त्याचा कोणताही अधिकार नाही. तरीही तो ऐकत नसेल तर त्याला कोर्टात खेचून धडा शिकवण्याचा सल्ला लोकांनी तिला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.