जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चक्क 91 वर्षाच्या महिलेशी संसार थाटून 'हा' व्यक्ती बनला करोडपती, परंतु...

चक्क 91 वर्षाच्या महिलेशी संसार थाटून 'हा' व्यक्ती बनला करोडपती, परंतु...

चक्क 91 वर्षाच्या महिलेशी संसार थाटून 'हा' व्यक्ती बनला करोडपती, परंतु...

काहीजण प्रेमासाठी तर काहीजण पैशासाठी आपल्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींशी लग्न करतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 26 मार्च-   प्रेमाला (love) वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. वयात खूप जास्त अंतर असणारी अनेक जोडपी आपण पाहिली असतील. मध्यंतरी एका वृद्धेनं आपल्या नातवाच्या वयाच्या मुलावर आपलं प्रेम असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. तो तरुण त्या वृद्धेपेक्षा तब्बल 39 वर्षांनी लहान होता. या दोघांची चांगलीच चर्चा झाली होती. प्रत्येक प्रकरणात प्रेम असेलच असं नाही, तर काही जण पैशांसाठीही आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करतात. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका 67 वर्षीय व्यक्तीनं 91 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं. लग्नानंतर तीन महिन्यांत तिचा मृत्यू झाला आणि तिची सर्व संपत्ती या व्यक्तीला मिळाली. या संदर्भातलं वृत्त द सनने दिलं आहे. झालं असं, की ब्रिटनमध्ये 67 वर्षांच्या व्यक्तीने 91 वर्षीय महिलेशी लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यांनी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिची कोट्यवधी रुपयांची संपत्ती त्या व्यक्तीच्या नावावर झाली. या प्रकारामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या व्यक्तीने जेव्हा या वृद्ध महिलेशी लग्न केलं, तेव्हा तिला स्मृतिभ्रंश (Dementia) झाला होता. विचार करण्याची क्षमता गमावल्यामुळे ती काय होतंय, हे समजू शकत नव्हती, अशी बाजू मांडून तिचे कुटुंबीय कोर्टात गेले होते. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, 91 वर्षीय जोआन ब्लास यांचा (Joan Blass) मार्च 2016 मध्ये मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह 67 वर्षीय कोलमन फोलनशी झाला होता. जोआनच्या मृत्यूनंतर तिची 2 कोटी रुपयांहून अधिक मूल्याची संपत्ती पती कोलमनला मिळाली. आईची संपत्ती न मिळाल्याने मुलांनी त्याविरोधात आवाज उठवला आणि हे प्रकरण चर्चेत आलं. आपल्या आईला या लग्नाची (marriage) माहिती नव्हती आणि कोलमनने आईशी गुपचूप लग्न केल्याचा आरोप मृत महिलेचा मुलगा मायकल (53) आणि मुलगी फ्रँक्स (62) यांनी केला. फ्रँक्सने सांगितलं, की तिच्या आईला डिमेंशिया झाला होता, त्यामुळे ती सर्व काही विसरू लागली होती. कोलमन फोलन नावाची व्यक्ती कोण आहे, हेही तिला आठवत नव्हतं. तिची आई हा माणूस आपल्या घरात का राहतो, असंही विचारायची. दरम्यान, आईच्या मृत्यूनंतर कोलमननेच आईवर अंत्यसंस्कार (funeral) केले होते आणि तिचं अज्ञात कबरीत दफन केलं आहे, असा आरोपही फ्रँक्सने केला आहे. वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिचं एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचं घर (house) कोलमनच्या नावावर झाले. घराचा अगदी काही भागच मुलांच्या नावावर होता. तसंच तिची 35 लाखांहून अधिक मूल्याची बचतही (savings) कोलमनला मिळाली. दरम्यान, कोलममने आपल्या आईची फसवणूक करून लग्न केल्याचा फ्रँक्स आणि मायकलचा खटला कोर्टाने (court) फेटाळून लावला आहे. त्यामुळे कोलमनने जोआनची फसवणूक करून लग्न केलं होतं की आणखी काही कारण होतं, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. परंतु तिची सर्व संपत्ती कोलमनला मिळाली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात