नवी दिल्ली 27 मार्च : सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेनं असा दावा केला की 10 वर्ष सोबत राहिल्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. मात्र, पतीच्या निधनानंतर 4 वर्षांनी या महिलेला समजलं की तिचा पती तिला धोका (Cheating) देत होता. यानंतर विधवा महिलेनं आपल्या पतीच्या प्रेयसीला जेव्हा त्याच्या निधनाची बातमी सांगितली, तेव्हा तिला यावर विश्वासच बसला नाही. बहिणीच्या लग्नात भावाचा भलताच प्रताप; केकमध्ये मिसळली अशी गोष्ट की सगळेच चक्रावले Mirror च्या वृत्तानुसार, 36 वर्षीय टिकटॉक यूजर ब्रिजेट डेविस हिच्या पतीचं 2018 साली निधन झालं. त्यांच्या लग्नाला तब्बल 10 वर्ष झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर तिला बायपोलट डिसऑर्डरचा त्रासही सुरू झाला. दुःखी ब्रिजेटने सोशल मीडियावर फॉलोअर्सला सांगितलं की कशाप्रकारे तिला समजलं की तिच्या पतीने तिला धोका दिला आहे (Extramarital Affair of Husband). यानंतर तिला आपल्या पतीच्या निधनाची बातमी त्या दुसऱ्या महिलेपर्यंतही पोहोचवावी लागली. व्हिडिओ क्लिपमध्ये ब्रिजेट आणि तिच्या पतीची गर्लफ्रेंड मेसेजच्या माध्यमातून एकमेकींसोबत संवाद साधताना दिसतात. हा व्हिडिओ अपलोड होताच व्हायरल झाला असून 1.5 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. चक्क 91 वर्षाच्या महिलेशी संसार थाटून ‘हा’ व्यक्ती बनला करोडपती, परंतु… मृत व्यक्तीच्या गर्लफ्रेंडला जेव्हा हे समजलं की तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिचा यावर विश्वासच बसला नाही. तिने मेसेजमध्ये लिहिलं, की मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी असा विचारच करू शकत नाही की तो आता माझ्यासोबत नाही. त्याने नेहमी माझ्यासोबत राहाणार असल्याचं वचन दिलं होतं. यानंतर ती ब्रिजेटला विचारते की मी तिथे जाऊ शकते का, जिथे माझ्या प्रियकराला दफन केलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.