नवी दिल्ली 07 जानेवारी : सहसा एखाद्याची पहिली झलक (Love at First Sight) पाहून त्याचं दिसणंच आपलं लक्ष वेधण्यासाठी पुरेसं असतं. एका महिलेच्या बाबतीतही असंच आहे. या महिलेचा लूक इतका खास आणि क्लासी आहे की तिच्यासोबत एकदा डेटवर (Dating) जाण्यासाठीही पुरुष काहीही करायला तयार असतात. मात्र, महिलेबद्दलच एक सत्य समजताच ते पुन्हा तिच्याकडे येत नाहीत. VIDEO : स्कूटी चालवायला शिकत होती तरुणी; अचानक रेस वाढवली अन्… महिलेनं TikTok वर आपल्यासोबत घडणारा हा अजब प्रकार (Woman Shared Weird Experience about Dating) शेअर केला आहे. महिलेच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरुनच लावू शकता की टिकटॉकवर तिचे 125k फॉलोअर्स आहेत. @princessaprilxo या अकाऊंटवरून आपल्यासोबत घडणारा प्रकार सांगत महिलेनं म्हटलं की तिला अनेक पुरुषांकडून अटेन्शन मिळतं. मात्र यातील फार कमीच लोक टिकतात. महिलेनं सांगितलं की तिचा लूक पाहून अनेक पुरुष तिला डेट करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र जेव्हा त्यांना महिलेचं खरं वय समजतं तेव्हा ते मागे हटतात. महिलेचं वय 44 वर्ष आहे. मात्र, आपल्या लूकमुळे ती 25-30 वर्षाची असल्यासारखं वाटतं. महिलेनं सांगितलं, की पुरुषांना मी तोपर्यंत आवडते, जोपर्यंत मी त्यांना माझं खरं वय सांगत नाही. टिकटॉकवर सध्या महिलेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला महिलेचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि महिलेच्या वयाबद्दल जाणून सगळेच हैराण झाले आहेत. महिलेनं आपल्या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, कोणालाही स्वतःपेक्षा मोठी महिला नको असते. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, मला नाही वाटत की ते पुरुष असतील, तुम्ही काही तरुणांना ओळखत असाल. एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं असेल तर वयाचा तितका फरक पडत नाही. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, वय नाही तर मन कसं आहे, हे महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.