Home /News /viral /

VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला

VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला

मैत्रीण अचानक स्टेजवर आली आणि नवरा-नवरीने स्वप्नातही विचार केला नसेल असं गिफ्ट तिने त्यांना दिलं.

  मुंबई, 07 जानेवारी : लग्न (Wedding Video) म्हटलं नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांना भेटही दिली जाते (Wedding gift Video). हल्ली मजा म्हणून नवरा-नवरीला (Bride Groom Video)  काहीही गिफ्ट दिलं जातं. सध्या अशाच एका गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नवरा-नवरीच्या मैत्रिणीने दोघांनाही असं गिफ्ट दिलं, जे पाहून फक्त नवरीबाईच नाही तर अगदी नवरदेवही लाजला. मैत्रिणीचं सरप्राइझ गिफ्ट पाहून नवरा-नवरी लाजेने गुलाबी झाले. सर्वांसमोरच तिने असं गिफ्ट दिलं की त्यांना हसू आवरलं नाही. व्हिडीओत पाहू शकता वर-वधू स्टेजवर उभे आहेत. तसं त्यांच्या आजूबाजूला कुणीच नाही. इतक्यात एक महिला तिथं येते. ती हसतच त्या दोघांजवळ येते. तिचे दोन्ही हात मागे असतात. वर-वधूच्या जवळ येताच ती आपला हात पुढे करते आणि तिच्या हातात जे काही दिसतं ते पाहून नवरा-नवरी दोघांनीही आधी धक्काच बसतो. असं गिफ्ट आपल्याला मिळेल याचा त्यांनी स्वप्नातही कधी विचार केला नसेल. सूरज निशाद नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - मित्र असावा तर असा! हा WEDDING VIDEO पाहताच नवरदेवाऐवजी त्याच्या मित्राचीच चर्चा आता तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता असेल की असं या महिलेने नेमकं या नवजोडप्याला दिलं तरी काय. तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिलेने नवरा-नवरीला चक्क मुळा दिला आहे. तिने लग्नात दोन मुळे आणले आणि नवरा-नवरीला प्रत्येकी एकेएक मुळा दिला. इतकंच नव्हे तर त्यांना मुळा देताना पोझ देत फोटोही काढला.
  लग्नात असं विचित्र गिफ्ट देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले होते. महागाईच्या काळात कुणी भाजीपाला कुणी कांदे दिले. तर कुणी अगदी लग्नात बारशाचीही तयारी केली. गिफ्ट म्हणून नवरा-नवरीला बाळाच्या दुधाची बाटली, पाळणं असंही काय काय दिलं. तर काहींनी तर लग्नानंतर नवरदेवाच्या धुलाईचं प्रतीक म्हणून मजेच नवरीच्या हातात लाटणंही दिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. हे वाचा - चॅलेंज जिंकण्यासाठी माधुरीने बकाबका खाल्ले मोमोज; काय अवस्था झाली पाहा VIDEO तुम्ही तुमच्या कुणाच्या लग्नात असं विचित्र गिफ्ट दिलं असेल किंवा तुम्हाला असं काही विचित्र गिफ्ट मिळाले असतील तर तो तुमचा तो किस्साही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या