जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : स्कूटी चालवायला शिकत होती तरुणी; अचानक रेस वाढवली अन्..., पाहा पुढे काय घडलं

VIDEO : स्कूटी चालवायला शिकत होती तरुणी; अचानक रेस वाढवली अन्..., पाहा पुढे काय घडलं

VIDEO : स्कूटी चालवायला शिकत होती तरुणी; अचानक रेस वाढवली अन्..., पाहा पुढे काय घडलं

महिला किंवा मुली स्कूटी चालवत असताना घडलेल्या अपघाताचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Accident Video Viral) होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 जानेवारी : मुली भरपूर जपून आणि घाबरून स्कूटी (Scooty) चालवतात असं म्हटलं जातं. अनेकदा यावरुन त्यांची मस्करी केली जाते. तर अनेकदा याच कारणामुळे त्यांचा अपघातही होतो. महिला किंवा मुली स्कूटी चालवत असताना घडलेल्या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Accident Video Viral) होत आहे. Shocking Video : मादी कुत्र्यासोबत खेळायला यायचा कुत्रा; तरुणाने जीवच घेतला यात एक तरुणी स्कूटी चालवताना ज्या पद्धतीने पडते, ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी स्कूटीवर बसते. ती ज्या पद्धतीने स्कूटी सुरू करून रेस वाढवते, ते पाहून लगेचच कळतं की तिने नुकतंच स्कूटी चालवायला शिकलं आहे. ती अचानक स्कूटीची रेस वाढवते, यामुळे गाडी अनियंत्रित होते.

जाहिरात

व्हिडिओमध्ये पुढे दिसतं की या तरुणीला स्कूटीचा हँडल कंट्रोल करणं शक्य होत नाही आणि काहीच अंतरावर जाऊन ती वाईट पद्धतीने खाली कोसळते. सुदैवाने या घटनेत तरुणीला काहीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, आता यापुढे स्कूटी हातात घेण्याआधी ती एकदा विचार नक्कीच करेल. OMG! अस्वलाच्या मांडीवर बसून मस्ती करू लागली तरुणी; पाहा पुढे काय घडलं, VIDEO हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर pineda.kevin46 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 1 लाख 44 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही करत आहेत. तर अनेकजण हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात