• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ऑनलाईन ऑर्डर केलेल्या Domino's पिझ्झामध्ये आढळलं भलतंच काही; पाहूनच चक्रावली महिला

ऑनलाईन ऑर्डर केलेल्या Domino's पिझ्झामध्ये आढळलं भलतंच काही; पाहूनच चक्रावली महिला

एका महिलेला आपल्या ऑर्डरमध्ये असं काही आढळलं (Woman Found Horrific Things In Pizza), जे पाहून ती हैराण झाली.

 • Share this:
  नवी दिल्ली 22 ऑगस्ट : आजकाल जंक फूड (Junk Food) लोकांच्या भरपूर पसंतीस पडतात. मात्र, या पदार्थांमध्ये काहीही न्यूट्रिशनल नसतं. मात्र, तरीही अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे पदार्थ सर्वांच्याच पसंतीस उतरतात. चायनीजपासून इटालियनपर्यंत तुम्हाला अनेक जंक आयटम मिळून जातात. ऑनलाईन डिलिव्हरी (Online Food Delivery) सुरू झाल्यापासून अनेकजण घरबसल्याच हे पदार्थ मागवतात. अशात एका महिलेला आपल्या ऑर्डरमध्ये असं काही आढळलं (Woman Found Horrific Things In Pizza), जे पाहून ती हैराण झाली. यूकेच्या लंकाशायर येथे राहणाऱ्या जेमा बार्टननं आपल्यासाठी डॉमिनोजचा लार्ज पिझ्झा (Domino's Pizza) ऑर्डर केला. मात्र, पुढे काय घडणार आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. तिनं ऑर्डर केलेला अर्धा पिझ्झा खाल्ला, यानंतर तिची नजर त्याच्यावरील टॉपिंग्सवर पडली. त्यात चिकनसोबतच लोखंडाचे खिळे, नट आणि वोल्ट टाकले गेले होते. पिझ्झामध्ये हे टॉपिंग्स पाहून महिला हैराण झाली. जेमानं हा पिझ्झा लंकाशायरच्या Thornton-Cleveleys स्टोरमधून मागवला होता. 'तिचं माझ्यावर प्रेम'; मगरीनं हल्ला करूनही विश्वास करत राहिली हँडलर, पण... पिझ्झामध्ये चिकनसोबत लोखंडाचे खिळे पाहून या महिलेनं याची तक्रार केली. स्टोरनं या चुकीसाठी महिलेची माफी मागितली. यानंतर महिलेनं आपल्या ऑर्डरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिनं लोकांना सल्ला दिला, की नेहमी आपली ऑर्डर तपासून घ्या. थोड्या हलगर्जापणामुळो मोठी दुर्घटना घडू शकते. जेमानं आपल्या पोस्टमध्ये फूड सेफ्टी एजन्सीलाही टॅग केलं होतं. VIDEO: आवडीनं खाता रस्त्यावरील चटकदार पाणीपुरी? विक्रेत्यानं पाण्यात मिसळली लघवी सोशल मीडियावर आता ही पोस्ट व्हायरल (Post Viral on Social Media) झाल्यानंतर डॉमिनोजनं या प्रकरणी सफाई दिली आहे. डॉमिनोजनं सांगितलं, की हे प्रकरण जुलैमधील आहे. तक्रार मिळताच जेमाला रिफंड दिला गेला होता, तो त्यांनी स्वीकारलाही होता. यानंतर पिझ्झा आउटलेटला वॉर्निंगही दिली गेली होती. अशात आता परत पोस्ट करणं हे केवळ त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: