• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • धक्कादायक! आवडीनं खाता रस्त्यावरील चटकदार पाणीपुरी? मग हा VIDEO बघाच, विक्रेत्यानं पाण्यात मिसळली लघवी

धक्कादायक! आवडीनं खाता रस्त्यावरील चटकदार पाणीपुरी? मग हा VIDEO बघाच, विक्रेत्यानं पाण्यात मिसळली लघवी

या व्हिडिओमध्ये एका पाणीपुरीच्या गाड्यावरील व्यक्ती पाणीपुरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात लघवी (Urine) मिसळताना दिसत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 22 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहयाला मिळतं. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडिओ इमोशनल (Emotional Video) करणारे. काही व्हिडिओ पाहून हसू आवरता येत नाही तर काही व्हिडिओ मात्र नकळत डोळ्यात पाणी आणतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे जो पाहून तुम्हाला प्रचंड राग येईल. या व्हिडिओमध्ये एका पाणीपुरीच्या गाड्यावरील व्यक्ती पाणीपुरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात लघवी (Urine) मिसळताना दिसत आहे. फोडणीसोबत बोल्डनेसचा तडका; रेसिपीपेक्षाही HOT CHEF एक हैराण करणाऱ्या घटनेत गुवाहाटीमधील एका पाणीपुरीवाल्याचा मगात लघवी करतानाचा आणि हेच पाण्यात मिसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मगामध्ये लघवी केल्यानंतर त्यानं त्याच मगाचा वापर पदार्थ लोकांच्या प्लेटमध्ये ठेवण्यासाठीही केला. हा व्हिडिओ अपलोड होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या व्यक्तीनं हे घाणेरडं काम का केलं , असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पाण्यात लघवी मिसळण्यामागे या व्यक्तीचा उद्देश नेमका काय होता, असं अनेकांनी विचारलं. जिथं तिथं ऐकू येतोय फक्त एकच आवाज, YouTuber हैराण; म्हणाला, 'मला मदत करा' मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती गुवाहाटीच्या अठगांव परिसरात स्टॉल लावतो. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या विक्रेत्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे. नेटकरी हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर स्ट्रीट फूढ खाण्याआधी तुम्हीही दहा वेळा विचार कराल.
  Published by:Kiran Pharate
  First published: