• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'तिचं माझ्यावर प्रेम'; मगरीनं प्राणघातक हल्ला करूनही डोळे झाकून विश्वास करत राहिली हँडलर, पण...

'तिचं माझ्यावर प्रेम'; मगरीनं प्राणघातक हल्ला करूनही डोळे झाकून विश्वास करत राहिली हँडलर, पण...

मगरीचा महिलेवर भयंकर हल्ला.

मगरीचा महिलेवर भयंकर हल्ला.

हँडलर बुल हिला मगरीनं पकडल्यामुळे दुखापत झाली असून तिच्या हाताची सर्जरी करावी लागली आहे. हँडलरनं म्हटलं, की आम्ही मगरीला आमच्याकडे ठेवण्यासाठी जितकं शक्य आहे तितकं लढत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 22 ऑगस्ट : यूटाच्या साल्ट लेक सिटीमध्ये एका मगरीनं हँडलरवरच हल्ला (Crocodile Attack on Handler) केला. स्केल्स अॅण्ड टेल्समध्ये एका लहान मुलाच्या बर्थडे पार्टीच्या (Birthday Party) दरम्यान पाहुण्यांसमोरच मगरीनं महिला हँडलरचा हात आपल्या जबड्यात पकडला. हे पाहून तिथे उपस्थित सर्वच हैराण झाले. मगरीला पाहण्यासाठी तिथे गेलेला लहान मुलगा तर इतका घाबरला की तो तिथेच रडू लागला. मुलाला रडताना पाहून ही महिला हँडलर म्हणाला, की हा जीव ( मगर ) माझ्यावर प्रेम करते आणि तिला यानंतरही काहीच होणार नाही. मात्र, मगरीनं महिलेचा हात जबड्यात घेतल्याचं पाहताच तिथे उपस्थित असलेल्या डोनी वाइसमॅननं पाण्यात उडी घेतली आणि मगरीच्या पाठीवर ते चढले. यानंतर मगरीनं महिलेचा हात सोडला. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या हल्ल्याबद्दल बोलताना हँडलर बुल आणि स्केल्स अॅण्ड टेल्स केंद्राचे मालक यांचं म्हणणं आहे, की यात कोणतंही नुकसान झालेलं नाही. लेक शेर तर आई सव्वाशेर! ऑन द स्पॉट एका क्षणात खल्लास केला 'खेळ' हँडलर बुल हिला मगरीनं पकडल्यामुळे दुखापत झाली असून तिच्या हाताची सर्जरी करावी लागली आहे. हँडलरनं म्हटलं, की आम्ही मगरीला आमच्याकडे ठेवण्यासाठी जितकं शक्य आहे तितकं लढत आहे. जोपर्यंत ती आमच्या निरीक्षणात आहे आणि आमची आवड आहे, तोपर्यंत ती कोणालाही नुकसान पोहोचवणार नाही. या मगरीनं तेच केलं, जे एक प्राणी करतो. VIDEO: आवडीनं खाता रस्त्यावरील चटकदार पाणीपुरी? विक्रेत्यानं पाण्यात मिसळली लघवी याबाबत स्थानिक माध्यमानी दिलेल्या वृत्तात म्हटलं, की ही हँडलर तीन वर्षापासून अधिक काळापासून या मगरीसोबत काम करत आहे. मगरीला आदेशांचं पालन करण्यासाठी प्रशिक्षणही दिलं गेलं होतं. हँडलर बुलनं म्हटलं, की मी या मगरीवर प्रेम करते. ती माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे. तिथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती डार्थवर (मगरीचं नाव) प्रेम करते. महिलेनं म्हटलं, की मगरीचं लक्ष तेव्हा विचलित झालं कारण तिला माहिती होतं, की आता तिला भोजन दिलं जाणार होतं. बुल म्हणाली, की मगरीला वाटलं त्यावेळी भोजन दिलं जात आहे, मात्र असं काही नव्हतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: