• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मुलीच्या मैत्रिणीवर जडलं बापाचं प्रेम; आईला धोका दिल्यानं भडकलेल्या तरुणीनं उचललं मोठं पाऊल

मुलीच्या मैत्रिणीवर जडलं बापाचं प्रेम; आईला धोका दिल्यानं भडकलेल्या तरुणीनं उचललं मोठं पाऊल

डायनाची ही मैत्रीण तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे आणि घरीच अभ्यास करते. उरलेल्या वेळेत ती डायनाच्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये काम करायची.

 • Share this:
  नवी दिल्ली 14 सप्टेंबर : कोणत्याही नात्यात विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. विशेषतः पती-पत्नीच्या नात्यात एकानंही धोका दिला (Cheating In Relationship) तरी प्रकरण अतिशय गंभीर होऊन जातं. सध्या समोर आलेल्या एका घटनेत एक तरुणी तेव्हा संपातली जेव्हा तिला समजलं, की तिच्या वडिलांनी आईसोबत विश्वासघात केला आहे आणि तेही आपल्याच मुलीच्या खास मैत्रिणीसाठी (Love Affair with Daughter’s Best Friend). मांजरीसाठी थांबवला फुटबॉलचा LIVE सामना; वाचवले मुक्या जीवाचे प्राण, पाहा VIDEO डायना नावाच्या मुलीनं TikTok वर @diana.j.t नावाच्या अकाऊंटवरुन ही घटना सांगितली आहे. तिचं कुटुंब एक फॅमिली रेस्टॉरंट चालवतं. इथेच तिची मैत्रीण फूल टाईम जॉब करायची. मात्र, आपल्या मैत्रिणीचे आपल्या वडिलांसोबत प्रेमसंबंध आहेत याची या तरुणीला अजिबातही कल्पना नव्हती. डायनाची ही मैत्रीण तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे आणि घरीच अभ्यास करते. उरलेल्या वेळेत ती डायनाच्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये काम करायची. डायनाच्या ग्रेटचिन नावाच्या या मैत्रीणीचं डायनाच्या वडिलांवरच प्रेम जडलं. डायनाच्या आईला या गोष्टीची भनक होती, की तिच्या पतीचं दुसऱ्याच महिलेसोबत अफेअर आहे. मात्र, तिला अजिबातही कल्पना नव्हती की ही महिला तिच्याच मुलीची मैत्रीण आहे. आजीनं अचानक केलं आजोबांना KISS; VIDEO मध्ये पाहा आजोबांची प्रतिक्रिया डायनाला हे समजल्यावर अतिशय दुःख झालं की तिचे वडील एका 26 वर्षाच्या मुलीसाठी तिच्या आईला सोडत आहेत. यामुळे नाराज झालेल्या डायनानं सोशल मीडियावर आपल्या मैत्रिणीच्या नावासह ही घटना शेअर केली. तिनं लिहिलेलं, की या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही की तुम्ही किती सुंदर आहात. जे धोका देणारे आहेत ते धोका देतातच. हे बाब माहिती होताच डायनाच्या आईनं रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोरच या अफेअरची पोलखोल केली. मात्र, तरीही तिच्या पतीला काहीच फरक पडला नाही. पण आता डायनाच्या आईनंही दुसरं लग्न केलं असून ती आता आनंदात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: