• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • एका मांजरीसाठी थांबवला फुटबॉलचा LIVE सामना; प्रेक्षकांनी वाचवले मुक्या जीवाचे प्राण, पाहा VIDEO

एका मांजरीसाठी थांबवला फुटबॉलचा LIVE सामना; प्रेक्षकांनी वाचवले मुक्या जीवाचे प्राण, पाहा VIDEO

मांजर स्टॅण्डमधून खाली कोसळते. मात्र, खाली उभा असलेल्या काही प्रेक्षकांनी अमेरिकी ध्वज पसरवून या मांजरीला कॅच केलं आणि तिचा जीव वाचवला.

 • Share this:
  नवी दिल्ली 14 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ चांगलेच चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ एका फुटबॉल मॅचमधील आहे. यात एक मांजर मरणाच्या दारात असल्याचं दिसतं. मात्र, तिथे असलेले प्रेक्षक या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न (Football Fans Catch Falling Cat During Match) करतात. विवाहितेनं Ex-BF सोबत संबंध ठेवत 3 मुलांना दिला जन्म; कारण ऐकून बसेल धक्का एका फुटबॉल मॅचदरम्यान अचानक एक मांजर स्टेडियमच्या सगळ्या वरच्या टियरमध्ये बॅनरला लटकलेली दिसते. मांजरीला इथे लटकलेलं पाहून स्टॅण्डमध्ये बसलेले लोक तिला वाचवण्यासाठी एकमेकांकडे बघतात मात्र कोणालाच काहीही सुचत नाही. यादरम्यान मांजर स्टॅण्डमधून खाली कोसळते. मात्र, खाली उभा असलेल्या काही प्रेक्षकांनी अमेरिकी ध्वज पसरवून या मांजरीला कॅच केलं आणि तिचा जीव वाचवला. हे दृश्य पाहून स्टॅण्डमध्ये बसलेले लोक आनंद व्यक्त करतात आणि ज्या लोकांनी डोकं चालवत मांजरीचा जीव वाचवला त्यांचं कौतुकही करतात. सोशल मीडिया शेअर केलेल्या पोस्टनुसार, ही घटना मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियममध्ये तेव्हा घडली जेव्ही तिथे मॅच सुरू होती. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 5 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनोख्या पद्धतीनं साजरा केला मुलीच्या जन्माचा आनंद; 50 हजार लोकांना पाणीपुरी वाटप सोशल मीडियावर हा व्हिडिओ Yianni Laros नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. एका यूजरनं लिहिलं, की एवढ्या लोकांनी प्रयत्न करूनही जर मांजरीला वाचवण्यात अपयश आलं असतं तर त्यांना फार वाईट वाटलं असतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअरही केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: