हायवेवर गाडी चावलत असतानाच दिसला साप, महिलेनं चालत्या गाडीतून मारली उडी आणि....

हायवेवर गाडी चावलत असतानाच दिसला साप, महिलेनं चालत्या गाडीतून मारली उडी आणि....

साप आणि महिला यांचा असा होता एकत्र प्रवास, पोलिसांनाही सापानं नमवलं.

  • Share this:

मिसौरी, 22 जून : अमेरिकेच्या मिसौरी (Missouri) राज्यात असं काहीतरी घडलं ज्यानं सर्वांना आश्चर्यचकित केलं. हायवेवर गाडी चालवत असताना अचानक महिलेला साप दिसला आणि ती किंचाळू लागली. भीतीनं या महिलेनं चालत्या गाडीतूनच बाहेर उडी मारली आणि पोलिसांना फोन केला. सोशल मीडियावर सध्या या सापाचा फोटो व्हायरल होत आहे. महिलेनं सापाला पाहिल्यानंतर गाडीतून उडी मारली आणि लांब पळू लागली.

युरेका पोलीस विभागाने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एका महिलेला आपल्या गाडीत साप असल्याचं दिसलं. पोलिसांनी लिहिले, मुलीला गाडीच्या आत साप दिसला आणि ती गाडीतून पळून गेली. त्यावेळी साप चक्क ड्रायव्हिंग सीटजवळ होता. जेव्हा सापाला बाहेर काढण्साठी पोलीस पोहचले तेव्हा त्यांना साप गाडीमध्ये एकदम आत घुसला होता. त्यामुळं त्याला बाहेर काढणं पोलिसांना जमत नव्हतं.

वाचा-जिराफाशी पंगा नकोच! गाडीचा पाठलाग करतानाचा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

वाचा-VIDEO : झोपलेलं असताना अचानक पांघरुणात आली मगर, पाहूनच उडाला थरकाप

महिलेने विनंती केल्यानंतर गाडी सापासह दुसऱ्या ठिकाणी नेली. युरेका पोलिस विभागाने एक छायाचित्र शेअर करत आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्हाला साप बाहेर काढता आला नाही. मग आम्ही साप स्वत:हून बाहेर जाण्याची वाट पाहत होतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साप काही वेळाने गाडीतून बाहेर गेला. दरम्यान सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.

वाचा-भररस्त्यात कोब्राने केली उलटी; पोटातून जे बाहेर पडलं VIDEO पाहून थक्क व्हाल

First published: June 24, 2020, 12:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading