भररस्त्यात कोब्राने केली उलटी; पोटातून जे बाहेर पडलं VIDEO पाहून थक्क व्हाल

या कोब्राच्या (COBRA) पोटात असं काही होतं, ज्यामुळे त्याला खूप त्रास होत होता.

या कोब्राच्या (COBRA) पोटात असं काही होतं, ज्यामुळे त्याला खूप त्रास होत होता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जून : एखाद्या सापाने आपलं भक्ष्य पकडतानाचे व्हिडीओ तर आपण अनेक पाहिलेत. मात्र सध्या सोशल मीडियावर (social media) असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये भररस्त्यात विषारी कोब्राने उलटी (cobra vomits) केली आहे. विशेष म्हणजे त्याने उलटी केल्यानंतर त्याच्या पोटातून जे बाहेर पडलं ते पाहून तिथं उपस्थित असलेलं सर्वच जण थक्क झाले. या कोब्राने असं काही खाल्लं होतं, जे पचलं नाही आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होता होता. तिथल्या स्थानिक लोकांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने सापांच्या तज्ज्ञांना पाठवलं आणि सापाला उलटी करण्याची ट्रेनिंग दिली. त्यानंतर सापाने उलटी केली. उलटी केल्यानंतर सापाच्या तोंडातून बाहेर पडली एक प्लास्टिकची बाटली. पोटातील ही प्लॅस्टिक बाटली बाहेर पडतात या सापाला बरं वाटलं. तो शांत झाला. हे वाचा - बाप रे! गाडीच्या बोनेटवर बसला भलामोठा हत्ती, ड्रायवरनं काय केलं पाहा VIDEO वन्यजीव संरक्षणाशी संबंधित अधिकाऱ्याच्या मते, उन्हाळ्यात बहुतेक वेळा साप जंगलातून बाहेर पडतात. या सापाला तहान लागली असावी आणि त्याने या बाटलीत पाणी पाहिलं असावं. कोणतीही वस्तू पूर्णपणे गिळण्याची सवय कोब्राला असते. तशी त्याने ही बाटलीही गिळली. मात्र त्याच्या पोटात ती पचली नाही, ज्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. हे वाचा - VIDEO : कुत्र्यासमोर बिबट्यालाही मानावी लागली हार, पाहा नेमकं काय घडलं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओतून पुन्हा दिसून आलं आहे प्लास्टिक किती घातक ठरू शकतं. अशा प्लास्टिकचा वापर केल्यानंतर ते उघड्यावर फेकू नका, यामुळे मुक्या जीवांना धोका पोहोचतो. प्लास्टिक वापरल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा. संपादन - प्रिया लाड हे वाचा - VIDEO - हत्तीही पडला चहाच्या प्रेमात; खास रेस्टॉरंटमध्येच घेतो चुस्की
    First published: