जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : झोपलेलं असताना अचानक पांघरुणात आली मगर, पाहूनच उडाला थरकाप

VIDEO : झोपलेलं असताना अचानक पांघरुणात आली मगर, पाहूनच उडाला थरकाप

VIDEO : झोपलेलं असताना अचानक पांघरुणात आली मगर, पाहूनच उडाला थरकाप

रात्री झोपेत जर पांघरुणात मगर आली तर आपलं काय होईल हा विचारच करून अंगावर काटा येतो

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : ऱात्री आपल्या पांघरुणात साधी पाल, सरडा किंवा घोण आली तरीही आपण किती किंचाळतो मग मगर आणि सापासारखे प्राणी आली तर काय होईल? याचा विचार करूनच अंगावर काटा येतो पण असं प्रत्यक्षा घडलं आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ tangothedwarfcaiman नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी या मगरीला नीट जवळ घेतल्याशिवाय मला झोप लागत नाही. टोगो असे या मगरीच्या पिल्लाचं नावं आहे. इंस्टाग्राम युझरच्या म्हणण्यानुसार, मगरीचे पिल्लू दररोज पलंगावर येते आणि त्यांना KISS करून पुन्हा टाकीमध्ये जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जाहिरात

या व्हिडीओला आतापर्यंत 78 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हे मगरीचं पिल्लू फार निरागस आणि क्यूट असल्याचं इन्स्टाग्राम युझरने म्हटलं आहे. ही मगर फार प्रेमळ असली तरी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिल्यानंतर काळजात धस्स होतं असं अनेक युझर्सनी म्हटलं आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात