मुंबई, 21 जून : जिराफ (giraffe) या प्राण्याकडे तसा शांत आणि लाजराबुजरा प्राणी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे जिराफ हा प्राणी कधी गाडीचा पाठलाग वगैरे करेल असे स्वप्नात देखील वाटणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो तुमचे हे सर्व भ्रम काही क्षणात तोडून टाकेल. एवढेच नव्हे तर थरारक असा हा व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके देखील वाढतील. सुधा रामन नावाच्या आयएफएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिराफाने गाडीचा पाठलाग करत तिला गाठले आहे. ट्विटरवर सुधा यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जिराफाला कधी डिवचू नका. त्यांचे पाय किती मजबूत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा. एका किकने ते कोणालाही लोळवू शकतात. ते खूप वेगाने अंत्यंत आकर्षक पद्धतीने धावतात.’ अशी कॅप्शन देत सुधा यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फेसबुकवरील असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
Never mess up with a Giraffe.
— Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) June 19, 2020
Watch the video to know how powerful are their legs. With one kick they can take anyone to ground. They run at a great speed with so much of grace. Video via FB. pic.twitter.com/rWAQpa9NtQ
या व्हिडीओमध्ये गाडीतील व्यक्तींना जिराफाने कोणतीही हानी न पोहोचवली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स खूप रोमांचित झाले आहेत. जिराफ इतक्या सहजपणे गाडीचा पाठलाग करू शकेल अशी अपेक्षा कुणी केलीच नव्हती.
What happens next? Curiosity should not be raised by sharing half video 😂
— Nishad Kulkarni 🇮🇳 (@nishadkulkarni) June 19, 2020
लोकांनी या प्रसंगाची तुलना ज्युरासिक पार्कमधील दृश्यांशी केली आहे. (हे वाचा- VIDEO : अगदी शांतपणे पकडला सिंकमध्ये आलेला भलामोठा पायथॉन, नेटकरी आश्चर्यचकित )