जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कारचा दरवाजा न उघडताच आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली तरुणी; थक्क करणारा VIDEO

कारचा दरवाजा न उघडताच आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली तरुणी; थक्क करणारा VIDEO

कारचा दरवाजा न उघडताच आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली तरुणी; थक्क करणारा VIDEO

ही महिला कारच्या आत जाण्यासाठी गाडीचा दरवाजाही उघडत नाही, तर कारच्या खिडकीतूनच ती आत जाते. अतिशय सुंदर पद्धतीने ती हे काम करते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 04 जून : सोशल मीडियावर तुम्ही अनेक विचित्र शॉर्टकटचे व्हिडिओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो अतिशय वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी एक महिला ज्या प्रकारचा शॉर्टकट घेते, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 17 वर्षांपासून आपल्या कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हा व्यक्ती; केला विचित्र खुलासा ही महिला गाडीच्या आत जाण्यासाठी अतिशय अजब पद्धत अवलंबते. सोशल मीडिया यूजर्स हे पाहून थक्क झाले आहेत, कारण यादरम्यान तिचा फिटनेस दिसत आहे. ही महिला कारच्या आत जाण्यासाठी गाडीचा दरवाजाही उघडत नाही, तर कारच्या खिडकीतूनच ती आत जाते. अतिशय सुंदर पद्धतीने ती हे काम करते. या अप्रतिम व्हिडिओने (Viral Video) नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

जाहिरात

या व्हिडिओने लोकांसमोर एक नवीन गोल सेट केला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही विचार कराल की कोणी इतकं फिट कसं असू शकतं. यासोबतच महिलेला असं करण्याची काय गरज होती, असा सवालही काही लोक विचारत आहेत. काहींनी म्हटलं की ती सरळ मार्गानेही गाडीच्या आत जाऊ शकली असती. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्यासाठीच तिने हे केलं आहे. मात्र, फिटनेस प्रेमींसाठी हा व्हिडिओ चॅलेंजपेक्षा कमी नाही. स्विमिंग पुलमध्ये उडी घेताच बेशुद्ध झाला चिमुकला; पुढे घडलं अनपेक्षित, Shocking Video व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कार रस्त्यावर उभी आहे. या गाडीचा दरवाजा बंद आहे पण खिडकी उघडी आहे. तेवढ्यात एक महिला तिथे येते आणि लगेच फ्लिप मारत खिडकीच्या मदतीने गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसते. इंस्टाग्रामवर imkavy नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे आणि लोकांच्या पसंतीसही उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात