मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्विमिंग पुलमध्ये उडी घेताच बेशुद्ध झाला चिमुकला; पुढे घडलं अनपेक्षित, Shocking Video

स्विमिंग पुलमध्ये उडी घेताच बेशुद्ध झाला चिमुकला; पुढे घडलं अनपेक्षित, Shocking Video

एका मुलाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो प्रत्येक पालकांसाठी धडा आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगा खेळताना स्विमिंग पूलमध्ये उडी मारत असल्याचं दिसतं

  नवी दिल्ली 04 जून : लहान मुलं खूप चंचल असतात. अनेकदा ते अतिशय घातक खेळही खेळतात. अशा परिस्थितीत ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या घरातील लोकांची जबाबदारी खूप वाढते. कारण मुलं इतकी खोडकर असतात की त्यांना एका जागी बसून ठेवणं खूप अवघड असतं. काही क्षणासाठी आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तरी अनेकदा काहीतरी मोठा उद्योग ते करून ठेवतात. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो प्रत्येक पालकांसाठी धडा आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगा खेळताना स्विमिंग पूलमध्ये उडी मारत असल्याचं दिसतं (Toddler Jumped in Swimming Pool). चप्पल वाचवण्याच्या नादात स्वतः चिखलाच्या दलदलीत अडकला व्यक्ती; क्षणात जमिनीत शिरला, Video या व्हिडिओमध्ये एका 4 वर्षाच्या मुलाने स्विमिंग पूलमध्ये उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. साहजिकच मुलाला पोहणं माहिती नव्हतं. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. पण सुदैवाने, शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका 12 वर्षांच्या मुलाने हे सर्व पाहिलं. त्यानंतर त्यानी तात्काळ वडिलांना याबद्दल माहिती दिली आणि त्या व्यक्तीने क्षणाचाही विलंब न करता धावत तलावात उडी मारली.
  या व्यक्तीने तलावात उडी घेऊन मुलाला बुडण्यापासून वाचवलं. मात्र जास्त पाणी नाका-तोंडात शिरल्याने हा मुलहा बेशुद्ध झाला होता. आणखी काही वेळ ही घटना कोणी पाहिली नसती तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी सतर्क राहाण्याचा आणि आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचा धडा देणारा आहे. माकडाने घेतला झोपलेल्या कुत्र्याशी पंगा; क्षणातच मिळालं कर्माचं फळ, मजेशीर Video हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर goodnews_movement नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो बातमी देईपर्यंत 1 लाख 86 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. यासोबतच या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका व्यक्तीने मुलाचा बचाव करणाऱ्या व्यक्तीला सुपरहिरो म्हटलं आहे. तर अनेकांनी म्हटलं की हा व्यक्ती वेळेवर तिथे पोहोचला नसता तर काहीही घडू शकत होतं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Viral video on social media

  पुढील बातम्या