नवी दिल्ली 04 जून : प्रेयसीपेक्षा मुलांना त्यांची वाहनं जास्त आवडतात असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र ते केवळ एक विधान नाही तर प्रत्यक्षातही हे खरं असू शकतं, हे एका तरुणाने सिद्ध केलं. अमेरिकेतील एका व्यक्तीने ही ओळ खरी असल्याचं सिद्ध करुन दाखवलं. नॅथॅनियल नावाच्या एका व्यक्तीने दावा केला आहे की तो त्याच्या 1998 शेवी मॉन्टे कार्लो कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे (Weird Love Story). स्पर्म डोनेट करून बनला 15 मुलांचा बाप; पण महिलांपासून लपवलं स्वतःचं धक्कादायक सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण आजपर्यंत तुम्ही अनेक अशा प्रेमकथा ऐकल्या असतील ज्या अजब आहेत. यात काही कपलमध्ये वयाच्या अंतर अतिशय जास्त असतं तर काहींना आपल्या पाळीव प्राण्यांवरच प्रेम होतं. मात्र, आता जी घटना समोर आली आहे, ती अतिशय अजब आहे. कारण यातील तरुणाला चक्क आपल्या कारवर प्रेम झालं आहे (Relationship With Car). मिररच्या रिपोर्टनुसार, एका डॉक्युमेंटरीमध्ये 37 वर्षीय नॅथॅनियलने आपल्या विचित्र प्रेमकथेचा खुलासा केला. तो त्याच्या कारला प्रेमाने ‘चेस’ म्हणतो. नॅथॅनियलचा दावा आहे की तो त्याच्या कारसोबत टेलिपॅथीद्वारे संवाद साधतो. प्रसूतीदरम्यान पतीचं ते वाक्य ऐकून भडकली महिला; डिलिव्हरी रूममधून केली हकालपट्टी, पण झाला वेगळाच परिणाम तो म्हणतो की त्याने वेगवेगळ्या पोझिशनमध्ये त्याच्या कारसोबत शारिरीक संबंधही ठेवले आहेत. नॅथॅनियल म्हणतो की, ही कार त्याचं पहिल्या नजरेत झालेलं प्रेम आहे. तो 2005 पासून या कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कारसोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवल्याचा दावाही त्याने केला आहे. ही अजब लव्हस्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







