नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : साप पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र, सगळेच साप विषारी नसतात, हे अनेकांना माहिती नसतं. जगभरात सापाच्या 2000 हून अधिक प्रजाती आहेत, मात्र यातील फक्त 100 प्रजाती अशा आहेत ज्या विषारी आणि घातक असतात. मात्र प्रत्येकाला हे साप ओळखू येतात, असं नाही. यामुळे लोक कोणत्याही सापाला पाहून घाबरतात आणि पळ काढतात. तर काही लोक असे असतात जे धाडस करून साप पकडतात. मात्र साप पकडणं तितकं सोपंही नाही. यासाठी बरीच सावधानी बाळगावी लागते. थोड्या हलगर्जीपणामुळेही जीव जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Snake) होत आहे. यात महिला अतिशय सावधगिरीने साप पकडताना दिसते (Woman Rescued a Snake).
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिलेनं कशाप्रकारे सापाला पकडून आणलं आणि एका पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू लागली. यादरम्यान सापही आपला फणा काढून बसला आहे. मात्र महिलाही एक्सपर्ट आहे. तिने अतिशय साधवगिरीने सापाला या पिशवीमध्ये टाकलं आणि ही पिशवी बांधली, जेणेकरून साप बाहेर येऊ शकणार नाही. यानंतर ती तिथून निघून गेली.
A brave Forest staff Roshini rescues a snake from the human habitations at Kattakada. She is trained in handling snakes.
Women force in Forest depts across the country is growing up in good numbers. VC @jishasurya pic.twitter.com/TlH9oI2KrH — Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) February 3, 2022
हा व्हिडिओ केरळच्या तिरुवअनंतपुरमधील कट्टकडा येथील आहे. साप पकडणाऱ्या या महिलेचं नाव रोशिनी आहे, ती फॉरेस्ट स्टाफमधून आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, एक धाडसी वन कर्मचारी रोशिनीने कट्टकडा येथे मानवी वस्तीत शिरलेल्या एका सापाला रेस्क्यू केलं. ती साप पकडण्यात एक्सपर्ट आहे. देशातील वनविभागात महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
अवघ्या 45 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 44 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 1900 हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Snake video